
मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या 227 प्रभागांसाठी मंगळवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, यंदाही शाळेच्या विद्यार्थ्यांद्वारे ही आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेचा कार्यकाळ 7 मार्च 2022 रोजी संपुष्टात आला असून, तेव्हापासून प्रशासक राजवट सुरू आहे. मागील निवडणूक 2017 मध्ये झाली होती. मुंबई महानगरपालिकेतील एकूण सदस्यसंख्या 227 आहे. यापैकी महिलांसाठी 114 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
अनुसूचित जातीसाठी (एससी) 15 प्रभाग आरक्षित आहेत, तर अनुसूचित जमातीसाठी (एसटी) 2 प्रभाग आरक्षित आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी 61 प्रभाग आरक्षित आहेत. सर्वसाधारण प्रभागांची संख्या 149 असून, त्यापैकी 74 महिलांसाठी राखीव आहेत.
The post Election News : मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











