Talathi Bharti 2026: 4,644 तलाठी पदांची भरती; जाणून घ्या पात्रता आणि ऑनलाइन अर्ज करण्याची संपूर्ण माहिती

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Talathi Bharti 2026 – Maharashtra Revenue and Forest Department (RFD) will soon release the Maharashtra Talathi Recruitment 2026 notification for over 4,644 vacancies. Eligible candidates with a graduate degree can apply online through the official website once the notification is formally published.


महाराष्ट्र महसूल आणि वन विभागाने तलाठी भरती प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. आता तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) पदांची भरती खासगी कंपनीमार्फत न होता महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत केली जाणार आहे. भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या भरतीद्वारे राज्यातील एकूण ४,६४४ रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये १,७०० नवीन पदांचाही समावेश आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल.

सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असेल. उमेदवारांना फक्त एका जिल्ह्यासाठी अर्ज करता येईल.

हे पण वाचा : EIL Bharti 2026: इंजिनीअर्स इंडिया लिमिटेडमध्ये 41 पदांसाठी भरती; पाहा पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत

Maharashtra Revenue and Forest Department

महाराष्ट्र तलाठी भरती 2026

Talathi Recruitment 2026 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाण महाराष्ट्र
एकुण जागा4,644

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू— /07/2026
अंतिम तारीखलवकरच जाहीर केली जाईल
परिक्षालवकरच जाहीर केली जाईल

अर्ज शुल्क

GEN/OBC/EWS1000
SC/ST/PWD/ESM900

Talathi Bharti 2026 : साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
तलाठी (ग्राम महसूल अधिकारी)4,644 (एकूण अंदाजित पदे)

Talathi Notification 2026 : साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तलाठी (ग्राम महसूल अधिकारी)
  • शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी अनिवार्य.
  • संगणक ज्ञान: MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  • भाषा: मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक आहे.

Talathi Bharti 2026 :  01/07/2026 रोजी वयोमर्यादा

  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 38 वर्षे
  • काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

Talathi Bharti 2026 : साठी निवड प्रक्रिया

  • लेखी परीक्षा: MPSC मार्फत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची (MCQ) परीक्षा.
  • कागदपत्र पडताळणी: लेखी परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे कागदपत्रांची तपासणी.
  • अंतिम निवड: गुणवत्तेवर आधारित अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.

Talathi Bharti Syllabus and Exam Pattern

विषयप्रश्न संख्याएकूण गुणकालावधी
मराठी व्याकरण2550
इंग्रजी व्याकरण2550
सामान्य ज्ञान (GK)2550
गणित व बुद्धिमत्ता2550
एकूण1002002 तास

Talathi Bharti 2026 : साठी अर्ज कसे करावे?

  1. प्रथम अधिकृत संकेतस्थळ mahabhumi.gov.in ला भेट द्या.
  2. “Talathi Bharti 2026 Apply Online” या लिंकवर क्लिक करा.
  3. तुमचा ईमेल आणि मोबाईल नंबर वापरून नवीन नोंदणी करा व खाते सक्रिय करा.
  4. तुमची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती बिनचूक भरा.
  5. ज्या जिल्ह्यासाठी अर्ज करायचा आहे तो काळजीपूर्वक निवडा (फक्त एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करता येईल)
  6. फोटो (२०० px) आणि स्वाक्षरी विहित आकारात (३ KB ते ५० KB) अपलोड करा.
  7. आवश्यक कागदपत्रे PDF फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
  8. तुमच्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क ऑनलाइन भरून अर्जाची अंतिम प्रत (Printout) जतन करा.

अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.

Some Useful Important Links

जाहिरात [PDF]👉Download Here
ऑनलाईन अर्ज (To be activated in July 2026)👉Visit Here
अधिकृत वेबसाइट👉Click Here

तलाठी भरती २०२६ ची जाहिरात कधी येणार आहे?

शासकीय निर्णयानुसार, रिक्त पदांचा अहवाल ८ मे २०२६ पर्यंत मागवण्यात आला असून, जुलै २०२६ मध्ये जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे.

तलाठी परीक्षेसाठी कोणती पदवी आवश्यक आहे?

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduation) असलेला उमेदवार या भरतीसाठी पात्र आहे.

आता ही परीक्षा MPSC का घेणार आहे?

सरळसेवा भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने तलाठी भरती MPSC कडे सोपवली आहे.

अर्जासाठी MS-CIT प्रमाणपत्र आवश्यक आहे का?

हो, संगणक ज्ञानासाठी MS-CIT किंवा त्यास समतुल्य प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!