राणी कित्तूर चन्नमा प्राणी संग्रहालयात 28 काळविटांचा संशयास्पद मृत्यू

Kalvit
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

कोल्हापूर : बेळगाव जवळ काही अंतरावर पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाला लागून भूतरामनहट्टी गावात राणी कित्तूर चन्नमा प्राणी संग्रहालयात तब्बल २८ काळविटांचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खांडरे यांनी दिले आहेत. 13 नोव्हेंबर रोजी आठ काळविटांचा मृत्यू झाला होता.

शनिवारी प्राणी संग्रहालयातील वीस काळविटांचा अचानक मृत्यू झाला. तीन दिवसांच्या कालावधीत अठ्ठावीस काळविटांचा मृत्यू झाल्याने या मृत काळविटांच्या मृत्यूचे कारण शोधणे हे वन विभागापुढे आव्हान बनले आहे. बॅक्ट्येरियल इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याची शंका वन खात्याकडून व्यक्त केली जात आहे. असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट नागराज यांनी प्राणी संग्रहलयाला भेट देऊन याबाबत माहिती घेतली.

दोन दिवसापूर्वी मृत झालेल्या काळविटांचे मृतदेह तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहेत. आता शनिवारी मृत झालेल्या काळविटांच्या मृतदेहांची तपासणी करण्यात येणार आहे. म्हैसूर आणि बन्नेरघट्टा येथून पशु वैद्यकीय तज्ज्ञ काळविटांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी येत आहेत.

The post राणी कित्तूर चन्नमा प्राणी संग्रहालयात 28 काळविटांचा संशयास्पद मृत्यू appeared first on Dainik Prabhat.

Source

Join Our WhatsApp Group!