पुण्यात ‘इन्स्टा गँग’चा पर्दाफाश! इन्स्टाग्रामवर झाली ओळख, नशेसाठी दिवाळीत फोडली ८ घरे..वाचा सविस्तर

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे – इंस्टाग्रामवर झालेली ओळख, त्यातून वाढलेली मैत्री आणि नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांनी तयार केली एक इंस्टा गँग! या टोळीने दिवाळीच्या काळात बंद घरांची रेकी करून तब्बल आठ घरफोड्या केल्या. या टोळीत एक विधिसंघर्षित बालकही असून, त्याच्यावर तब्बल नऊ गुन्ह्यांची नोंद आहे. विमानतळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने या सराईत टोळीचा पर्दाफाश करीत तब्बल १४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की टोळीप्रमुख नवनाथ ऊर्फ लखन बाळू मोहिते (वय २२, वैदुवाडी, हडपसर) असून, त्याच्यावर अंमली पदार्थ बाळगण्याचा आणि विक्रीचा गुन्हा हडपसर पोलिसांत दाखल आहे. त्याच्यासोबत शिवम दत्ता अवचर (१९, नऱ्हे, अभिनव कॉलेज शेजारी) आणि एक विधिसंघर्षित बालक गुन्ह्यात सामील होते. हे तिघेही इंस्टाग्रामवर एकमेकांना भेटले. मैत्री वाढली आणि नशेच्या खर्चासाठी त्यांनी घरफोडीचा मार्ग स्वीकारला.

हे आरोपी गुन्हा करताना मोबाइलचा वापर टाळत असल्याने त्यांचा माग काढणे कठीण झाले होते.दरम्यान, २९ ऑक्टोबरला एका घरात झालेल्या मोठ्या घरफोडीच्या तपासादरम्यान पोलिसांनी २५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलीस शिपाई योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, लालू कणे आणि हरीप्रसाद पुंडे यांच्या मेहनतीतून आरोपींचा माग काढण्यात आला. सापळा रचून तिघांना पकडण्यात आले. दिवाळीच्या काळात ७ घरफोड्या केल्याची कबुली त्यांनी दिली.

त्यांच्याकडून १० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. या प्रकरणांतून अतिरिक्त २ लाख ६ हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.दरम्यान, त्यांनी चोरीतील सुमारे आठ ते नऊ तोळे सोने एका सराफाला विकले असल्याचे उघड झाले आहे. त्या सराफालाही पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ४ तोळे सोने जप्त केले.

ही कारवाई उपआयुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक शरद शेळके, उपनिरीक्षक मनोज बरुरे, नितीन राठोड तसेच कर्मचारी योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, लालू कणे, हरीप्रसाद पुंडे, रुपेश पिसाळ, गणेश इथापे, दादासाहेब बर्डे, शैलेश नाईक, अंकुश जोगदंडे, सागर कासार, पांडुरंग म्हस्के, अंबादास चव्हाण आणि राहुल जोशी यांच्या पथकाने केली.

इंस्टावर गुन्हेगार सक्रिय..
इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात गुन्हेगार आणि त्यांच्या समर्थकांची खाती आहेत. यातून ते एकमेकांचे समर्थन करतात किंवा एकत्र येऊन गुन्हेगारी कट रचतात. हे प्रकार लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी गुन्हेगारी सोशल मीडियावर कडक वॉच ठेवला आहे. या अगोदरही सोशय मीडियावर रील टाकणाऱ्या आणि त्यांच्या समर्थक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

The post पुण्यात ‘इन्स्टा गँग’चा पर्दाफाश! इन्स्टाग्रामवर झाली ओळख, नशेसाठी दिवाळीत फोडली ८ घरे..वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!