ओबीसी नेते लक्ष्मण हाके ‘या’ दिवशी बारामती दौऱ्यावर; पिंपळी येथे ओबीसीची जन आक्रोश परिषदेचे आयोजन

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

बारामती : ओबीसी नेते लक्ष्मण हाके 14 नोव्हेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी 1 वाजता बारामती नगरपरिषद येथे काळुराम चौधरी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. दुपारी 2 वाजता सामाजिक कार्यकर्ते संपतराव टकले यांच्या निवासस्थानी ओबीसी बांधवांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

दुपारी 3 वाजता गोजूबावी येथे दलित बांधवांशी चर्चा व बैठक करुन सायंकाळी 4 वाजता झारगडवाडी येथे समाज बांधवांची भेट व चर्चा करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता पिंपळी येथे खोट्या कुणबी दाखल्या विरोधात ओबीसी समाजाची “पर्दाफाश” जन आक्रोश परिषदेला देखील हाके उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत अॅड मंगेश ससाणे, बसपाचे काळुराम चौधरी, विष्णू चव्हाण, बापूराव सोलनकर हे नेते देखील उपस्थित राहणार आहेत.

 

The post ओबीसी नेते लक्ष्मण हाके ‘या’ दिवशी बारामती दौऱ्यावर; पिंपळी येथे ओबीसीची जन आक्रोश परिषदेचे आयोजन appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!