“जे घडतयंन ते अक्षम्य…” धर्मेंद्र यांच्या निधनाच्या वृत्तांवर हेमा मालिनी संतापल्या

Dharmendra - Hema Malini |
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Dharmendra – Hema Malini |  ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धर्मेंद्र यांच्या निधनाच्या वृत्तांना फेटाळून लावलं. त्यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत फेक न्यूज देणाऱ्यांना फटकारलं आहे. याआधी मुलगी ईशा देओलने पोस्ट लिहित स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानंतर आता हेमा मालिनी यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.

हेमा मालिनी यांनी पोस्ट करत लिहिले की, “जे काही घडतंय ते अक्षम्य आहे. जी व्यक्ती उपचारांना प्रतिसाद देत आहे आणि बरी होत आहे त्यांच्याबद्दल जबाबदार चॅनेल्स अशा खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात? हे अत्यंत अनादरयुक्त आणि बेजबाबदार आहे. कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेचा योग्य आदर करा,” अशा शब्दांत त्यांनी फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर राग व्यक्त केला आहे. Dharmendra – Hema Malini |

ईशा देओल पोस्ट- 

तर ईशा देओलने पोस्ट करत लिहिले की, “मीडिया अतिरेक करत असल्याचं दिसतंय आणि चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर असून ते बरे होत आहेत. आम्ही सर्वांना विनंती करतो की आमच्या कौटुंबिक खासगीपणाचा आदर करावा. वडिलांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते,” अशी पोस्ट ईशा देओलने लिहिली.

सध्या धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असून ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती हेमा मालिनी यांनी दिली आहे. Dharmendra – Hema Malini |

हेही वाचा: 

धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा; मुलगी ईशा देओलने पोस्ट शेअर करत सांगितले सत्य

 

The post “जे घडतयंन ते अक्षम्य…” धर्मेंद्र यांच्या निधनाच्या वृत्तांवर हेमा मालिनी संतापल्या appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!