
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात याच मंडळींनी तोंड फाटेस्तोवर शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र निवडून आल्यावर यांची तोंडे शिवली गेली आहेत. कर्जमाफीमधला ‘क’ उच्चारायला कचरणारी यांची जीभ शेतकऱ्यांची थट्टा करताना मात्र हातभर लांब होते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तेच केले. बरोबर आहे, ते शेतकरी कुठे आहेत? ते तर सहकार सम्राट आहेत. त्यामुळे त्यांना सामान्य कर्जबाजारी शेतकऱ्यांची, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या कराव्या लागलेल्या शेतकरी कुटुंबांची व्यथा काय समजणार? असे प्रश्न विचारण्यात आले आहेत.
सरकारकडून हजारो कोटींचे कर्ज उकळतात
पुन्हा ही कर्जमाफी हे काही सत्ताधाऱ्यांचे उपकार नाहीत. ती शेतकऱ्यांची गरज आहे आणि जनतेचा पोशिंदा म्हणून त्यांचा हक्कदेखील आहे. विखे-पाटलांसारखी सत्तेतली मंडळी ती गरजही मानत नाहीत आणि कर्जमाफीचा हक्कदेखील नाकारतात. त्यांचे स्वतःचे साखर कारखाने मात्र ही मंडळी सरकारी भांडवलावर उभे करतात. पुढे गैरकारभार आणि भ्रष्टाचार यामुळे ते डबघाईला येतात. त्यासाठी ही मंडळी सरकारकडून परत कर्ज घेतात. तरीही कारखाने बंदच पडतात. मग हे बंद पडलेले साखर कारखाने हीच मंडळी कवडीमोल भावात विकत घेतात. ते चालविण्यासाठीही सरकारकडून हजारो कोटींचे कर्ज उकळतात, असा आरोप अग्रलेखातून करण्यात आला आहे.
थट्टा करण्याची हिंमत….
ज्या शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण्यांनी साखर कारखाने सुरू केले, ते सर्वच साखरसम्राट झाले. पुढे त्याच्या जोरावर शिक्षण सम्राट वगैरे झाले. त्यावरच राजकारण आणि सत्ताकारणात त्यांचे पीक तरारले आहे, पण ज्याच्या नावाने हे केले तो सामान्य ऊस उत्पादक आजही आहे तेथेच आहे. त्याच्या उसाला आजही वाजवी भाव मिळतच नाही. तो मिळाला असता तर ना त्याने सोसायटी घेतली असती, ना तो कर्जबाजारी झाला असता, ना कर्जमाफीवरून त्याची थट्टा करण्याची हिंमत विखे-पाटलांसारख्यांना झाली असती, असेही अग्रलेखात म्हटले आहे.
हेही वाचा : फरिदाबादच्या छापेमारीनंतर घाईत दहशतवादी डॉ. उमरने दिल्ली स्फोटांचा प्लॅन आखला? ; तपासात ‘हे’ १० खुलासे उघड
The post “एका कार्यक्रमात हे महाशय…”; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या ‘त्या’ विधानाचा ‘सामना’च्या अग्रलेखातून समाचार, सगळचं काढलं… appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











