पुणेकरांसाठी ‘कोल्ड’ अपडेट! अवकाळी पावसानंतर हवामान कोरडे, पुढील ४८ तासांत थंडी वाढणार

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शहरासह जिल्ह्यात थंडीची चाहूल लागली असून, गेल्या २४ तासांत किमान तापमानात एक ते दोन अंशांनी घट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळच्या थंडीचा जोर हळूहळू वाढू लागला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवल्याने थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.शहरात गेल्या २४ तासात किमान तापमान १८ ते २० अंशांच्या आसपास होते.

पाषाण येथे १८ अंशांवर असलेले किमान तापमान आज (दि. ७) १६.५ अंशांपर्यंत खाली आले. शिवाजीनगर येथील थंडीचा पारा १७ अंशांपर्यंत खाली आला. मागील आठ दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे हवामानात सातत्याने बदल होत होता. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावली आणि आता थंडीएवजी पाऊस ठाण मांडून बसणार का? असे वाटत होते. मात्र, गेल्या तीन दिवसांपूर्वी पावसाचा जोर ओसरला आणि हवामान कोरडे झाले.

सूर्यदर्शनामुळे मागील दोन दिवसांपासून शहरातील किमान तापमानात घटून थंडीची चाहूल लागली. आज सकाळी थंडीचा पारा आणखी एक ते दोन अंशाने घटल्यामुळे उपनगरातील काही भागात धुके पसरल्याचे दिसून आले. दरम्यान, शहरासह जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस हवामान कोरडे आणि आकाश निरभ्र राहील. कमाल तापमानात फारसा बदल होणार नसून, किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.

The post पुणेकरांसाठी ‘कोल्ड’ अपडेट! अवकाळी पावसानंतर हवामान कोरडे, पुढील ४८ तासांत थंडी वाढणार appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!