कधी होऊ शकते महिलांना अटक, काय सांगतो कायदा? महत्त्वाची गोष्ट घ्या जाणून

कधी होऊ शकते महिलांना अटक, काय सांगतो कायदा? महत्त्वाची गोष्ट घ्या जाणून
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Indian Law for Women : भारतीय संविधानात प्रत्येक गुन्ह्यासाठी आणि गुन्हागारासाठी शिक्षा ठरवून देण्यात आली आहे. एवढंच नाही तर, पुरुष आणि महिलांसाठी देखील फार वेगळे कायदे आहे. जे फार कोणाला माहिती देखील नसतील… काही महिलांनी त्यांच्या हक्कांबद्दल फारसं काही माहिती देखील नसेल… ज्यामुळे महिलांना कठीण काळात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं… म्हणून आज आपण महिलांशी संबंधित या हक्कांबद्दल जाणून घेणार आहोत.

भारतात महिलांच्या सुरक्षेशी संबंधित अनेक कायदे आणि नियम आहेत, जे महिलांना गुन्ह्यांपासून संरक्षण देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी काम करतात. भारतात, CrPC च्या कलम 46(4) मध्ये अशी तरतूद आहे की सूर्यास्तानंतर महिलेला अटक करणं कायद्याच्या विरोधात आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सूर्यास्तानंतर कोणत्याही महिलेला अटक करता येत नाही. जर तुम्हाला एखाद्या महिलेला तक्रारीबाबत विचारपूस करायची असेल आणि उशिरा आला असेल तर पोलीस तिच्या घरी जाऊन चौकशी करु शकतात.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, फक्त महिला पोलीस अधिकारीच महिलेची तपासणी करू शकतात. कोणताही पुरुष पोलीस अधिकारी कोणत्याही परिस्थितीत महिला स्पर्श करू शकत नाही. अटकेच्या वेळी जर महिला गर्भवती असेल तर ती तिच्यासोबत एका अन्य एक व्यक्ती सोबत ठेवण्याची मागणी करु शकते.

काही महिलांना या अधिकाराची माहिती नसते. महिला कॉन्स्टेबल देखील रात्रीच्या वेळी महिलेला अटक करू शकत नाही. जरी गुन्हा विशेषतः गंभीर असला तरी… रात्रीच्या वेळी महिलेला अटक करणं का आवश्यक आहे? हे पोलिसांना मॅजिस्ट्रेटला लेखी स्वरूपात सांगावं लागतं…

बऱ्याचदा, सामाजिक, कौटुंबिक किंवा इतर कारणांमुळे, महिला घटनेच्या वेळी पोलिसांना घटनेची तक्रार करू शकत नाहीत. अशा प्रकरणांमध्ये, एखाद्या महिलेने उशिरा तक्रार दाखल केली तरी, पोलिस तिची तक्रार नोंदवण्यास नकार देऊ शकत नाहीत. महिला ईमेलद्वारे देखील त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात.

(टीप: जर तुमच्याकडे विशिष्ट केस असेल तर कायदेशीर वकिलांचा सल्ला घेणं योग्य आहे. येथे दिलेली माहिती केवळ न्यायालयाच्या निर्णयांवर आहे. जर तुम्हाला कोणत्याही केससाठी जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही योग्य वकिलांचा सल्ला घेऊ शकता.)

Source

Join Our WhatsApp Group!