
प्रभात वृत्तसेवा
चिंबळी – खेड तालुक्यातील औद्योगिक भागातील कुरुळी केंद्रांतर्गत येणाऱ्या कडवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी बसण्याची सोय व्हावी या उद्देशाने ‘दाना केअर फाउंडेशन’च्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या दोन वर्गखोल्यांचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.हे सामाजिक कार्य व दातृत्व समजून ‘दाना केअर फाउंडेशन’च्या सीएसआर (CSR) फंडातून या वर्गखोल्या बांधण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम सोनवणे, सरपंच शिवगंगा सोनवणे, उपसरपंच तसेच सर्व सदस्य आणि आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या वर्गखोल्यांचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी उपसरपंच वैशाली माळशिकर, बाजार समितीचे माजी सभापती काळूराम कड, दाना केअर फाउंडेशन कंपनीचे रफीक शेख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय कड, सर्व शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The post Khed News : कडवस्ती शाळेत ‘दाना केअर फाउंडेशन’कडून दोन वर्गखोल्यांचे लोकार्पण appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











