राजगुरूनगरमध्ये उत्सुकता शिगेला! अध्यक्षपदासाठी सस्पेन्स कायम, नगरसेवक पदासाठी मात्र चुरस वाढली

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
राजगुरूनगर – राजगुरूनगर नगरपरिषद निवडणुकीसाठी अध्यक्षपदासाठी अजून एकही उमेदवारी अर्ज आला नसून नगरसेवक पदासाठी आतापर्यंत सात उमेदवारांनी दहा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शैलजा पाटील, मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी दिली.राजगुरूनगर नगरपरिषद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ तीन दिवस बाकी आहेत.

नगरपरिषदेच्या निवडणुकीत अध्यक्षपदासह नगरसेवक पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. पाच दिवसात नगराध्यक्ष पदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. केवळ ३ दिवस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिल्लक आहेत. या तिन्ही दिवशी अनेक उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याने प्रशासनावर मोठा ताण येणार आहे. उमेदवारी अर्ज भरताना मोठे शक्ती प्रदर्शन होणार असल्याची चर्चा आहे.

दि. १० नोव्हेंबरल एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. दि. ११ रोजी प्रभाग क्रमांक एक मधून सुनंदा बाळासाहेब थिगळे यांनी तर प्रभाग पाच मधून सविता अमोल सुक्रे यांनी त्यांचे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी (दि. १२) निरंक दिवस राहिला. गुरूवारी (दि.१३) प्रभाग क्रमांक तीन (अ) मधून माजी नगरसेविका स्नेहल मछिंद्र राक्षे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून एक आणि अपक्ष एक उमेदवारी अर्ज भरला.

प्रभाग क्रमांक आठ (ब) मधून माजी नगरसेवक सुरेखा हरिभाऊ क्षोत्रीय यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रभाग क्रमांक दहा (अ) मधून शिवसेना एकनाथ शिंदे गटातून अरविंद गजानन गायकवाड यांनी तर याच प्रभागातून (ब) सुप्रिया राहुल पिंगळे, छाया धनंजय पिंगळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, अपक्ष म्हणून त्यांनीच प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणूनही दाखल केला आहे.

महिलांनी मारली बाजी..
राजगुरूनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत आतापर्यंत महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. आतापर्यंत ६ महिलांनी त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले; यात माजी नगरसेवक स्नेहल राक्षे, सुरेखा क्षोत्रीय यांचा समावेश असून माजी नगरसेवक संगीता गायकवाड यांचे पती अरविंद गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केला. आतापर्यंत केवळ एका पुरूष उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरला आहे.

The post राजगुरूनगरमध्ये उत्सुकता शिगेला! अध्यक्षपदासाठी सस्पेन्स कायम, नगरसेवक पदासाठी मात्र चुरस वाढली appeared first on Dainik Prabhat.

Source

Join Our WhatsApp Group!