
प्रभात वृत्तसेवा
आळेफाटा – बेल्हे (ता. जुन्नर) गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल चार कोटी तीस लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन गुरूवारी (दि. १३) ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले. या निधीतून नवीन ग्रामपंचायत इमारत, आकर्षक बगीचा, स्मशानभूमी बांधकाम आणि स्वच्छतागृह उभारणी यांसारखी महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
या विकासकामांमध्ये नवीन ग्रामपंचायत इमारत उभारणीसाठी सर्वाधिक तीन कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी ८० लाख रुपये नागरी सुविधा निधीतून, ६० लाख रुपये वित्त आयोग निधीतून, तर उर्वरित रक्कम ग्रामपंचायतीकडून जमा केली जाईल.याशिवाय गावाच्या सौंदर्यवर्धनासाठी जिल्हा परिषद निधीतून वीस लाख रुपये खर्चून आकर्षक बगीचा तयार करण्यात येणार आहे.
स्मशानभूमी बांधकामासाठी वीस लाख आणि बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृह व स्नानगृहासाठी वीस लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.यावेळी सरपंच मनीषा जानकु डावकर, उपसरपंच राजेंद्र पिंगट, ग्रामविकास अधिकारी किशोर रायसिंग वाकडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते.गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने ही कामे महत्त्वाचे पाऊल असल्याचे सरपंच मनीषा डावकर यांनी सांगितले.
The post Junnar News : बेल्हे गावाचा चेहरामोहरा बदलणार; तब्बल ४.३० कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











