
Dhruv Jurel back to back century in IND A vs SA A a match : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला असून, यामध्ये युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलचा समावेश आहे. याच मालिकेच्या तोंडावर सध्या भारत ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघांमध्ये अनऑफिशियल कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ध्रुव जुरेलने बॅटने ‘डबल धमाका’ करत दोन्ही डावांमध्ये शतके झळकावली आहेत. यासह त्याने एक खास पराक्रमही केला.
दुसऱ्या डावातही जुरेलचे दमदार शतक –
बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या अनऑफिशियल कसोटी सामन्यात ध्रुव जुरेलच्या बॅटमधून पहिल्या डावातही शतकी खेळी पाहायला मिळाली होती. यानंतर त्याने दुसऱ्या डावातही हीच कामगिरी कायम ठेवली. जुरेलने दोन्ही डावांत झळकावलेल्या शतकांमुळे भारतीय ‘अ’ संघ कठीण परिस्थितीतून बाहेर पडला.
Dhruv Jurel in the 2nd Unofficial Test against South Africa A:
– Hundred in the first innings.
– Hundred in the second innings.What a player, What a star!
#DhruvJurel #INDvSA #INDAvSAA pic.twitter.com/K3r4eop5zE
— Saabir Zafar (@Saabir_Saabu01) November 8, 2025
दुसऱ्या डावात जुरेल फलंदाजीला आला, तेव्हा भारतीय ‘अ’ संघाने १०० धावांच्या आसपासच धावसंख्या गाठली होती. या परिस्थितीत जुरेलने हर्ष दुबे सोबत महत्त्वपूर्ण भागीदारी रचत केवळ संघाला सावरले नाही, तर संघाला विजयाच्या दिशेने नेले. दुसऱ्या डावात ध्रुव जुरेलने नाबाद १२७ धावांची उत्कृष्ट खेळी केली. त्याच्या या खेळीच्या बळावर भारतीय संघाने आपला दुसरा डाव ३८२ धावांवर घोषित करून दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघासमोर ४१७ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे.
हेही वाचा – IND vs AUS : अखेरचा सामना रद्द; तरीही भारत विजयी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध T20I मालिकेतील वर्चस्व कायम
ध्रुव जुरेलने केला हा खास पराक्रम –
दक्षिण आफ्रिका ‘अ’ विरुद्धच्या या दुसऱ्या अनऑफिशियल कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत शतक झळकावून ध्रुव जुरेलने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारत ‘अ’ संघाकडून खेळताना दोन्ही डावांत शतके ठोकणारा तो केवळ दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
यापूर्वी, २०१४ मध्ये नमन ओझाने ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्धच्या सामन्यात दोन्ही डावांत शतके झळकावण्याचा विक्रम केला होता. आता ध्रुव जुरेलने त्याची बरोबरी केली आहे. त्याच्या या सातत्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे, आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाच्या ‘प्लेइंग इलेव्हन’मधून वगळणे आता संघ व्यवस्थापनासाठी मोठे आव्हान ठरू शकते.
The post IND A vs SA A : ध्रुव जुरेलचा कहर! सलग दोन्ही डावात शतक झळकावत आफ्रिकन गोलंदाजांची उडवली दाणादाण appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.













