बिहारमध्ये खळबळ! कचऱ्यात सापडल्या शेकडो VVPAT स्लिप्स, निवडणूक अधिकारी निलंबित

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

समस्तीपूर, बिहार: समस्तीपूर जिल्ह्यातील सरायरंजन विधानसभा परिसरात कचऱ्यामध्ये मोठ्या संख्येने व्हीव्हीपॅट (VVPAT) मशीनच्या स्लिप्स आढळल्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

माहिती मिळताच जिल्हाधिकारी रोशन कुशवाहा यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्लिप्स ताब्यात घेतल्या. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, या आढळलेल्या स्लिप्स मॉक पोल (Mock Poll – चाचणी मतदान) दरम्यानच्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या स्लिपवर कोणताही परिणाम झालेला नाही.

तरीही, हा अत्यंत गंभीर निष्काळजीपणा मानून आयोगाने तातडीने कठोर कारवाई केली आहे. याप्रकरणी संबंधित सहायक निवडणूक अधिकारी (ARO) ला निलंबित (Suspended) करण्यात आले असून, त्यांच्यावर ‘एफआयआर’ (FIR) दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. डीएम यांनी याप्रकरणी विभागीय चौकशीची शिफारस केली आहे.

या घटनेवरून राष्ट्रीय जनता दलाने (RJD) निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. “एव्हीएम आणि VVPAT स्लिप्स रस्त्यावर कशा आणि का फेकल्या गेल्या?” असा सवाल करत आरजेडीने लोकशाहीच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आरजेडीने EVM स्ट्रॉंगरूमच्या सुरक्षेची मागणी केली आहे.

The post बिहारमध्ये खळबळ! कचऱ्यात सापडल्या शेकडो VVPAT स्लिप्स, निवडणूक अधिकारी निलंबित appeared first on Dainik Prabhat.

Source

Join Our WhatsApp Group!