Farhan Khan: “त्यांना वाईट वाटलं…”; फरहान अख्तरने सांगितला अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Farhan Khan: बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करणे हे कोणत्याही कलाकारासाठी सन्मानास्पद असते. दिग्दर्शक आणि अभिनेता फरहान अख्तरलाही 2004 साली प्रदर्शित झालेल्या ‘लक्ष्य’ या चित्रपटात बिग बींसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत हृतिक रोशन, प्रीती झिंटा आणि ओम पुरी यांच्यासारखे कलाकारही झळकले होते.

अलीकडेच फरहान अख्तर ‘आपकी अदालत’ या लोकप्रिय शोमध्ये हजर होता. यावेळी त्याने ‘लक्ष्य’च्या शूटिंगदरम्यान घडलेला एक किस्सा सांगितला. ज्यामुळे कदाचित अमिताभ बच्चन यांना वाईटही वाटले होते.

फरहान अख्तरचा अनुभव

फरहान म्हणाला, “त्या दिवशी बिग बींचा चित्रपटाच्या शूटिंगसाठीचा पहिलाच दिवस होता. आम्ही लष्करी छावणीत शूट करत होतो, त्यामुळे सगळं काम खूप शिस्तबद्धपणे करावं लागत होतं. अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की ठराविक वेळेत पॅकअप व्हायला हवं, अन्यथा पुन्हा परवानगी घ्यावी लागेल. त्यामुळे मी थोडा तणावात होतो आणि वेळेत काम पूर्ण व्हावं याची काळजी घेत होतो.”

त्याने पुढे सांगितलं, “त्या दिवशी अमिताभ सर तयार होण्यासाठी थोडा वेळ घेत होते. मला वाटलं की कदाचित त्यांना काही अडचण येत असेल, म्हणून मी त्यांच्या खोलीत जाऊन विचारलं, ‘सर, काही अडचण तर नाही ना?’ माझा हेतू फक्त मदत करण्याचा होता, पण मला वाटतं माझं बोलणं त्यांना थोडं पटलं नसावं. त्यांनी कदाचित असा विचार केला असेल की मी त्यांना अभिनय शिकवतोय. मला नंतर त्याची जाणीव झाली आणि मी त्यांची माफी मागितली.”

बिग बींची प्रतिक्रिया

फरहानच्या या गोष्टीवर अमिताभ बच्चन यांनीदेखील एकदा ‘कौन बनेगा करोडपती’च्या कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी सांगितलं, “त्या दिवशीचं वातावरण खूप शांत होतं. आम्ही आधीच्या सेट्सवर मस्ती करत काम करत असायचो, पण इथे सगळं फार गंभीर आणि शिस्तीत होतं. मला माझा संवादही नीट बोलता येत नव्हते, खूप रिटेक घ्यावे लागले. शेवटी फरहानने पॅकअप सांगितला.”

बिग बी पुढे म्हणाले, “नंतर फरहान माझ्या खोलीत आला आणि विचारलं, ‘सर, काही अडचण आहे का?’ मला क्षणभर वाटलं की हा मला सांगतोय की अभिनय कसा करायचा! मला खूप वाईट वाटलं. मी लगेच जयाला फोन करून सांगितलं. ती म्हणाली, ‘जर तुला आनंद वाटत नाहीये तर बॅग भर आणि घरी ये.’ पण मला वाटलं की असं करणं योग्य नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा भेटलो, हसत-खेळत काम केलं आणि नंतर सगळं छान झालं.”

शेवटचा अनुभव

फरहान अख्तर म्हणतो, “बिग बींबरोबर काम करणे म्हणजे एक मोठा सन्मान होता. ते अतिशय व्यावसायिक, शिस्तप्रिय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. त्या छोट्या गैरसमजुतीनंतर आमचं काम अतिशय सुरळीत आणि आनंददायी झालं.”

The post Farhan Khan: “त्यांना वाईट वाटलं…”; फरहान अख्तरने सांगितला अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!