Delhi Blast Video : धड्डाम आवाज, लोकांच्या किंचाळ्या अन् एकच धावपळ… स्फोटाची थरारक दृश्य CCTV मध्ये कैद

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात सायंकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी i20 Hyundai कारमध्ये भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटानंतर मोठा आवाज झाला आणि आगीचे लोट उठले, ज्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली.  दिल्लीतील स्फोटाची थरारक दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली असून, स्फोट होताच परिसरात आरडाओरडा आणि गोंधळ सुरू झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून, अज्ञातांविरोधात यूएपीए (UAPA) अंतर्गत कलम 16 आणि 18 नुसार गुन्हा दाखल केला आहे. i20 गाडीचा जुना मालक मोहम्मद सलमानला ताब्यात घेण्यात आले आहे, तर सध्याचा मालक पुलवामा येथील तारीक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्ली पोलीस, एनआयए आणि सीआयएसएफ पथके घटनेचा सखोल तपास करत आहेत.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!