Bhumi Abhilekh Bharti 2025 – 903 भूकरमापक पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Bhumi Abhilekh Bharti 2025 – महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने 2025 वर्षासाठी ‘भूकरमापक’ (गट-क) पदाच्या सरळसेवा भरतीसाठी अधिकृत जाहिरात (क्र. 01/2025) प्रसिद्ध केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत राज्यभरातील विविध विभागांमध्ये एकूण 903 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज (Apply Online) सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (Notification PDF) काळजीपूर्वक वाचून सर्व अटी व शर्ती समजून घ्याव्यात, जेणेकरून अर्ज करताना कोणतीही चूक होणार नाही.

हे पण वाचा : Canara Bank Apprentice Bharti 2025 – 3500 रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

(Maharashtra Bhumi Abhilekh) Department of Land Records Maharashtra

भूमि अभिलेख विभाग भरती 2025

जाहिरात क्र : 01/2025

भूमी अभिलेख भरती 2025 अंतर्गत, महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाने गट-क संवर्गातील ‘भूकरमापक’ पदासाठी एकूण 903 जागांची घोषणा केली आहे. पात्र उमेदवार या पदांसाठी 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Bhumi Abhilekh Recruitment 2025 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
एकुण जागा903
 Important Dates
अर्ज सुरू01 ऑक्टोबर 2025
अंतिम तारीख24 ऑक्टोबर 2025
परिक्षा13 व 14 नोव्हेंबर 2025

Bhumi Abhilekh Bharti 2025 : साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
भूकरमापक 903
विभाग (Region)
 
पुणे विभाग
 83
कोकण विभाग, मुंबई
 259
नाशिक विभाग
 124
छ. संभाजीनगर विभाग
 210
अमरावती विभाग
 117
नागपूर विभाग
 110

Bhumi Abhilekh Notification 2025 : साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
भूकरमापक 
  • मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा संस्थेमधील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma in Civil Engineering). किंवा
  •  माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (ITI) दोन वर्षांचे सर्वेक्षक (Surveyor) व्यवसायाचे प्रमाणपत्र.
  • टीप: मराठी टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रति मिनिट वेगाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक आहे. तथापि, ही अहर्ता नसलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात, परंतु त्यांना नियुक्तीच्या तारखेपासून दोन वर्षांच्या आत हे प्रमाणपत्र मिळवणे बंधनकारक असेल.

Bhumi Abhilekh Bharti 2025 : साठी वयोमर्यादा

24 ऑक्टोबर 2025 रोजी वयोमर्यादा
  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 38 वर्षे
  • काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

Bhumi Abhilekh Bharti 2025 साठी अर्ज शुल्क

  • (GEN/OBC/EWS) : 1000
  • (SC/ST/PWD/ESM) : 900
  • उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.

Bhumi Abhilekh Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड ऑनलाईन संगणक-आधारित परीक्षेतील (Computer-Based Test) गुणांच्या आधारावर केली जाईल. अंतिम गुणवत्ता यादीसाठी पात्र ठरण्याकरिता उमेदवारांनी काही किमान निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • गुणवत्ता यादीत समाविष्ट होण्यासाठी, उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेमध्ये एकूण गुणांच्या किमान 45% गुण मिळवणे अनिवार्य आहे.

Bhumi Abhilekh Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

  1.  सर्वप्रथम भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत अर्ज पोर्टलवर https:// ibpsreg.ibps.in/ gomsep25/ भेट द्या.
  2. मुख्यपृष्ठावरील “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” (Click here for New Registration) या लिंकवर क्लिक करा.
  3. आवश्यक वैयक्तिक माहिती, जसे की नाव, संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी टाकून नोंदणी पूर्ण करा. तुम्हाला एक तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड मिळेल.
  4. तुमच्या नोंदणी क्रमांक आणि पासवर्डने लॉग इन करून अर्ज भरा. यामध्ये शैक्षणिक पात्रता, पत्ता आणि इतर तपशील काळजीपूर्वक भरा.
  5. निर्देशांनुसार तुमचा फोटो, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणापत्र स्कॅन करून अपलोड करा.
  6. अर्ज शुल्काचा भरणा ऑनलाईन पद्धतीने (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग इ.) करा आणि अर्ज अंतिमरित्या सादर (Submit) करा.
  7. अर्जाची एक प्रत डाउनलोड करून ठेवा.
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
Some Useful Important Links
जाहिरात [PDF] 👉Download Here
ऑनलाईन अर्ज 👉Visit Here
अधिकृत वेबसाइट👉Click Here

 

Join Our WhatsApp Group!