Actress Payal Ghosh: लाल किल्ला बॉम्बस्फोटात पायल घोषची जिवलग मैत्रीण ठार; “ती माझं कुटुंब होती, एक आठवड्यापूर्वीच बोलले होते”… अभिनेत्री भावनिक

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Actress Payal Ghosh: दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. या भीषण घटनेत अभिनेत्री पायल घोष हिची जिवलग मैत्रीण मृत्युमुखी पडल्याने ती पूर्णपणे कोसळली आहे. पायलला अजूनही विश्वास बसत नाही की तिची मैत्रीण आता या जगात नाही. अभिनेत्रीने सांगितले की, या घटनेच्या फक्त एक आठवड्यापूर्वीच तिच त्या मैत्रिणीशी शेवटची बोलण झालं होत.

लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट

सोमवार, 10 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ चालत्या कारमध्ये जोरदार स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेतच पायल घोषची शाळेतील जिवलग मैत्रीण सुनीता मिश्रा हिचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

“ती माझं कुटुंब होती”… पायल घोष

एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत पायल घोषने डोळ्यांत पाणी आणणारा अनुभव सांगितला. ती म्हणाली,

“मला अजूनही विश्वास बसत नाही की ती आता नाही. आम्ही एक आठवड्यापूर्वीच बोललो होतो. ती अतिशय जिंदादिल मुलगी होती. नेहमी हसणारी, सगळ्यांत सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी. इतक्या कोमल आत्म्याला इतक्या क्रूर पद्धतीने हरवावं लागणं शब्दांच्या पलीकडचं आहे. ती फक्त मैत्रीण नव्हती, ती माझं कुटुंब होती. आम्ही एकत्र वाढलो, स्वप्नं पाहिली, हसलो, रडलो आणि प्रत्येक संघर्षात एकमेकांना आधार दिला.”

पायल घोषची लोकांना विनंती

या घटनेनंतर पायल घोषने लोकांना आवाहन केलं आहे की लाल किल्ला स्फोटातील पीडित कुटुंबांना मदत करावी. तिने सांगितलं की अशा कठीण काळात समाजाने एकत्र येऊन पीडितांना मानसिक आणि आर्थिक आधार द्यावा.

दिल्ली सरकारची घोषणा

  • दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी स्फोटग्रस्त कुटुंबांसाठी मदतीची घोषणा केली आहे.
  • मृतांच्या कुटुंबांना 10 लाख रुपये,
  • कायम अपंग झालेल्यांना 5 लाख रुपये,
  • आणि गंभीर जखमींना 2 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे.

कोण आहे पायल घोष?

पायल घोष ही दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे. तिने तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हिंदी चित्रपट ‘कोई जाने ना’ मध्येही ती झळकली होती. तसेच, लोकप्रिय हिंदी मालिका ‘साथ निभाना साथिया’ मध्ये राधिका या भूमिकेत ती दिसली होती.

 

The post Actress Payal Ghosh: लाल किल्ला बॉम्बस्फोटात पायल घोषची जिवलग मैत्रीण ठार; “ती माझं कुटुंब होती, एक आठवड्यापूर्वीच बोलले होते”… अभिनेत्री भावनिक appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!