
Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणूक २०२५ ची मतमोजणी सध्या सुरु असून, आतापर्यंतचे कल एनडीएच्या बाजूने दिसत आहेत. आतापर्यंतचे ट्रेंड्स पाहता, एनडीए २०३ जागांच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे, तर महागठबंधन केवळ ३४ जागांवर आघाडीवर आहे. या विजयी आघाडीवर भाजपने देशभरात जल्लोष साजरा केला असून, विरोधकांनी मात्र जोरदार टीका केली आहे.
निवडणुकीच्या ट्रेंडनुसार सर्व एनडीए पक्ष २०३ जागांवर आघाडीवर आहेत. भाजपकडे ९२ जागा, नितीश कुमार यांच्या जेडीयूकडे ८३, चिराग पासवान यांच्या एलजेपीआरकडे २१ जीतन राम मांझी यांच्या एचएएमकडे ४ आणि उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएमकडे ४ जागा आहेत. यामध्ये सर्वाधिक जागा भाजपकडे ९२ असल्याचं दिसून येत आहे. या अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानत त्यांना आश्वासनदेखील दिलं आहे.
सुशासन की जीत हुई है।
विकास की जीत हुई है।
जन-कल्याण की भावना की जीत हुई है।
सामाजिक न्याय की जीत हुई है।
बिहार के मेरे परिवारजनों का बहुत-बहुत आभार, जिन्होंने 2025 के विधानसभा चुनावों में एनडीए को ऐतिहासिक और अभूतपूर्व जीत का आशीर्वाद दिया है। यह प्रचंड जनादेश हमें…
— Narendra Modi (@narendramodi) November 14, 2025
पंतप्रधानांनी पोस्टमध्ये काय म्हटलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. “सुशासनाचा विजय झाला आहे. विकासाचा विजय झाला आहे. जनकल्याणाच्या भावनेचा विजय झाला आहे. सामाजिक न्यायाचा विजय झाला आहे,” असं पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजय मिळवून दिल्याबद्दल मी राज्यातील जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो. हा प्रचंड जनादेश आम्हाला जनता-जनार्दनांची सेवा करण्याची आणि बिहारसाठी नव्या संकल्पाने काम करण्याची ताकद देणारा आहे”, असंही मोदी यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी राज्यातील जनतेला विविध विकासकामांचं आश्वासन दिलं आहे.
The post Bihar Election 2025 : बिहार निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, ट्विट करत म्हणाले…. appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











