Video : एका रात्रीत ‘National Crush’ झाल्यानंतर गिरिजा ओकची पहिलीच प्रतिक्रिया; अभिनेत्रीला वाटतेय ‘या’ गोष्टीची भीती, ‘माझा १३ वर्षांचा मुलगा…’

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Girija Oak | National Crush – मराठी आणि हिंदी मालिका-चित्रपट आणि रंगभूमी गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे “गिरिजा ओक-गोडबोले’. सौंदर्याबरोबरच आपल्या अभिनयाच्या बळावर गिरिजा ओकने चित्रपट सृष्टीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तारे जमीन पर’ आणि ‘शोर इन द सिटी’ या चित्रपटातून गिरिजाच्या हिंदी चित्रपटांमधील गाजलेल्या भूमिका आहेत. त्यानंतर गिरीजा गुलमोहर, हाऊसफुल, लज्जा इत्यादीसह इतर अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसली.

गिरिजा वयाच्या 15 व्या वर्षापासून अभिनयाच्या क्षेत्रात असून तिला अभिनयाचा वारसा घरातूनच मिळाला आहे. गिरिजा प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांची कन्या आहे. गिरीजा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही ग्लॅमर्स फोटो शेअर करत असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

पण सध्या सोशल मीडियावर जिकडे तिकडे गिरिजा च दिसत आहे. रातोरात गिरीजा ‘नॅशनल क्रश’ म्हणून व्हायरल झाली आहे. एका मुलाखतीतील तिचा लूक पाहून लोक तिच्या सौंदर्याची स्तुती करत आहेत. निळी साडी, पांढरा ब्लाऊज, छोटी टिकली, मोकळे केस यामध्ये ती सुंदर दिसत आहे. गिरीजा ओकला आत्ता अख्खा देश ओळखू लागला आहे. पण महाराष्ट्रासाठी, मराठी लोकांसाठी ती नवीन नाही. तिला आपण मालिका, नाटक, सिनेमा आणि जाहिरातींमधून पाहतच आलोय.

पण अशातच तिच्या फोटोंची छेडछाड करून, फॉर्फ फोटो व्हायरल करून तिची इमेज खराब करण्याचा प्रयत्नही होत आहे. यासंदर्भात आता तिनं व्हिडिओ शेअर केला आहे. गिरिजानं एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत ती म्हणते की, अचानक इतकं प्रेम मिळतंय, मेसेज येतायत, फोन येतायत…भारी वाटतंय, त्यासाठी आभारी आहेत. अनेकांनी मीम्स पाठवलेत.

पण यासोबतच काही फोटो, व्हिडिओ एआयच्या माध्यमातून एडिट करूनही व्हायरल केले जात आहेत, ते अश्लील आहेत.मी याच काळातली मुलगी आहे. मला माहिती आहे की, ट्रेडिंग होतो तेव्हा अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल केल्या जातात. विशेषता बायकांचे, पुरुषांचे फोटो व्हायरल केले जातात. तुमच्या पोस्टवर क्लिक करावं यासाठी हे सगळं केलं जातं. यासाठी कोणतेही नियम नाहीयेत. मला याची भीती वाटतेय.

माझा मुलगा आज १३ वर्षाचा आहे. त्याने जर नंतर हे फोटो पाहिले तर, त्याला कसं वाटेल. त्याला हे देखील माहिती असेल की, हे फोटो खरे नाहीये. हे तुम्हालाही माहिती असं की हा फोटो एडिट केलाय,पण पाहताना एक चीप प्रकारची मजा येते… या सगळ्याचा विचार करून मी हा व्हिडिओ केलाय. हे एडिट, अपलोड करणाऱ्यांपैकी नसाल, पण तुम्ही लाइक्स करणाऱ्यापैकी असाल तरीही विचार करा…असं गिरिजानं म्हटलंय. तर आत्ता जे प्रेम मिळतंय, त्यामुळं जर माझे सिनेमे, माझ्या नाटकांनाही प्रेक्षकांची गर्दी होणार असेल तर याहून छान काहीच नाहीये…असंही ती म्हणाली.

The post Video : एका रात्रीत ‘National Crush’ झाल्यानंतर गिरिजा ओकची पहिलीच प्रतिक्रिया; अभिनेत्रीला वाटतेय ‘या’ गोष्टीची भीती, ‘माझा १३ वर्षांचा मुलगा…’ appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!