प्रधानमंत्री आवास योजना-2 मुळे लाखो कुटुंबांचे ‘घरकुल स्वप्न’ होणार साकार

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

मुंबई,  – केंद्र सरकारने स्वस्त घर निर्मितीला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना- 2 सुरू केली आहे. त्यामुळे आगामी काळात स्वस्त घर निर्मिती आणखी वाढेल असे मत आयआयएफएल होम फायनान्स कंपनीचे प्रमुख व्यवसाय अधिकारी प्रवीण खुल्लार यांनी सांगितले.

ही कंपनी प्रधानमंत्री आवास योजना नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी पुणे मुंबईसह विविध शहरात कार्यशाळा आयोजित करीत असून याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या शहराबरोबरच छोट्या शहरात स्वस्त घरनिर्मितीला चालना मिळावी यासाठी ही कंपनी आपल्या 300 पेक्षा जास्त शाखांच्या माध्यमातून कार्यरत असल्याचे कंपनीचे विभागीय विक्री व्यवस्थापक अभिषेक शर्मा यांनी सांगितले.

ऑगस्ट 2025 पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना – शहर अंतर्गत 8.56 लाख घरांना मान्यता मिळाली असून यातील 75 हजार घरे महिलांच्या नावावर करण्यात आली आहेत. त्यामुळे महिला सबलीकरणाला चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

The post प्रधानमंत्री आवास योजना-2 मुळे लाखो कुटुंबांचे ‘घरकुल स्वप्न’ होणार साकार appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!