
कोलकत्ता – जीएसटी परिषदेने जीवन विमा पॉलिसी प्रीमियमवरील जीएसटी कमी केल्यामुळे या क्षेत्रातील घडामोडी वाढल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात वार्षिक पातळीवर प्रीमियम संकलन 12.1% वाढून 34,007 कोटी रुपये इतके झाले आहे. सलग दुसर्या महिन्यामध्ये प्रीमियम संकलन 10% पेक्षा जास्त दराने वाढले आहे.
विमा क्षेत्र नियंत्रकांनी पुरविलेल्या माहितीच्या आधारावर हे मूल्यांकन केअर एड्ज या संस्थेने केले आहे. ऑगस्ट महिन्यात प्रीमियम संकलन 5.2 टक्क्यांनी कमी झाले होते. वैयक्तिक पातळीवर विमा घेण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे प्रीमियम संकलन वाढत असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.
हे प्रीमियम संकलन केवळ एखाद्या कंपनीचे वाढलेले नाही तर सर्वच कंपन्यांचे वाढले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील लाइफ इन्शुरन्स कार्पोरेशनसह खासगी क्षेत्रातील बहुतांश विमा कंपन्यांच्या प्रीमियम संकलनात ऑक्टोबर महिन्यात वाढ झाली आहे.
केअर एड्ज रेटिंगज या संस्थेचे वरिष्ठ संचालक संजय आगरवाल यांनी सांगितले की, भारतातील विशिष्ट सामाजिक परिस्थितीचा विचार करून जीएसटी परिषदेने जीवन आणि आरोग्य विम्यावरील प्रीमियमवर जीएसटी कमी केला आहे.
त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून या क्षेत्रातील घडामोडी कमालीच्या वेगाने वाढत आहेत. भारतातील नागरिकात विमा घेण्याचे प्रमाण कमी होते. जीएसटी परिषदेने घेतलेल्या या सकारात्मक निर्णयामुळे विमा घेण्याचे प्रमाण आगामी काळात आणखी वाढत राहण्याची शक्यता आहे. आरोग्य आणि वैयक्तिक विमा प्रिमीयमवर पूर्वी 18% जीएसटी होता. तो संपुष्टात आणला आहे. याची अंमलबजावणी 12 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे.
The post जीएसटी कपातीनंतर विमा क्षेत्रात उसळी; ऑक्टोबरमध्ये प्रीमियम संकलन तब्बल 34,000 कोटींवर appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











