दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात सायंकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी i20 Hyundai कारमध्ये भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटानंतर मोठा आवाज झाला आणि आगीचे लोट उठले, ज्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून, अज्ञातांविरोधात यूएपीए (UAPA) अंतर्गत कलम 16 आणि 18 नुसार गुन्हा दाखल केला आहे. i20 गाडीचा जुना मालक मोहम्मद सलमानला ताब्यात घेण्यात आले आहे, तर सध्याचा मालक पुलवामा येथील तारीक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्ली पोलीस, एनआयए आणि सीआयएसएफ पथके घटनेचा सखोल तपास करत आहेत. या घटनेचा नवा व्हिडीओ समोर आला आहे.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











