Pune news : वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

पुणे – अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जेष्ठ पादचाऱ्याचा मृत्यू झाला. शिवाजी भानुदास वैरागे (वय. 62,रा. माळीमळा लोणीकाळभोर) असे पादाचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी, शिवाजी यांचा मुलगा विजय वैरागे यांनी लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 2 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरील दत्त गॅरेजजवळ माळीमळा परिसरात घडली आहे.

फिर्यादींचे वडील रस्त्याने चालत घरी निघाले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनचलकाने त्यांना जोरात धडक दिली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गंभीर जखमी झाल्याने शिवाजी यांचा मृत्यू झाला.

The post Pune news : वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!