मृत्यूचा सापळा बनल्या Sleeper बसेस, कुठपर्यंत चालणार नियमांची ऐशी तैशी?

मृत्यूचा सापळा बनल्या Sleeper बसेस, कुठपर्यंत चालणार नियमांची ऐशी तैशी?
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

राजस्थानच्या जैसलमेरमध्ये बसला आग लगल्याने नुकताच २० लोकांची मृत्यू झाला. तसेच आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका स्लीपर बसला झालेल्या अपघातात २० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. एका दुचाकीला धडक दिल्यानंतर बसने पेट घेतला आणि ही भीषण दुर्घटना घडली.राजस्थानच्या जैसलमेरच्या प्रकरणात तपासात या बसेसमध्ये फटाके ठेवण्यात आल्याचेही उघडकीस आले आहे. खाजगी ट्रॅव्हलच्या बसेसमध्ये मोठ्या प्रमाणावर सामानाची बेकायदेशीर वाहतूक केली जात असते. यात अनेक सुरक्षाविषयक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. पर राज्यातून येणाऱ्या खाजगी बसेस तर अनेक नियम पायदळी तुडवत असतात असे उघडकीस आले आहे.

राजस्थानचे जैसलमेर असो की आंध्रातील कुर्नूल असो दोन्ही ठिकाणी प्रत्येकी २० प्रवाशांची हकनाक बळी गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या भयानक घटनेत प्रवाशांना वाचवण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.जैसलमेर घटनेची चौकशी झाली असता बसेसमध्ये फटाके देखील ठेवले होते असे उघडकीस आले आहे. त्यामुळे आगीने विक्राळ रुप धारण केल्याचे म्हटले जाते. अशा बसेसच्या बांधणीत अनेक चुका असतात. आतील गँगवे पुरेसा रुंद नसतो. आपत्कालिन मार्ग सहज उघडता येईल असा नसतो. अग्निशामक उपकरणे आणि आगीच्या क्षणी कसे बाहेर पडावे याची प्रवाशांना माहिती नसते किंवा त्याची रंगीत तालीम वेळोवेळी घेतली जात नाही.

या अपघातानंतर प्रश्न निर्माण झाला आहे की देशभरात खाजगी बसेसमध्ये प्रवाशांसोबत मोठ्या प्रमाणात सामानांची वाहतूक का केली जाते ? याकडे परिवहन विभाग आणि आरटीओच्या अधिकाऱ्यांचे लक्ष का नसते ? दर काही महिन्यांनी नवा अपघात होतो आणि त्यानंतर काही दिवस कारवाईचे नाटक केले जात असते. त्यामुळे अशा बसेस चालत्या फिरत्या मृत्यूच्या आगार बनल्या आहेत. लोकांना काहीही पर्याय नसल्याने असा धोकादायकपणे प्रवास करावा लागत आहे.

मुंबई आणि दिल्ली सारख्या महानगरातून अनेक आंतरराज्यीय खाजगी बसेस चालवण्यात येत असतात. या बसेसना नॅशनल परमिट प्रवाशांच्या आणण्याचे आणि नेण्याचे असते. परंतू या बसेस सर्वसामान्य प्रवाशांना खचाखच भरलेल्या असतात. या बसेसच्या डिग्गी आणि छतावर अवैध माल भरलेला असतो. या बसेसच्या डिग्गी आणि छतांवर अवैध माल लादलेला असतो. अनेक बसेसमध्ये ज्वलनशील सामग्री असते. त्याची तपासणी करणारे कोणीही नसते. बस मालकांसाठी हा फायद्याचा सौदा असतो. एकीकडे प्रवाशांकडून भाडे वसुल करणे आणि दुसरीकडे विना ई-वे बिल वाल्या मालाची वाहतूक करुन कमाई केली जाते.हे मोटर वाहन अधिनियमाचे नियमांचे उल्लंघन आहेच शिवाय जीएसटी चोरीचा मार्ग आहे.

या बसेसमध्ये आधी आसने प्रवाशांनी भरली जातात. नंतर खाली डिग्गी, छत आणि एवढेच काय कधी-कधी गँगवेतही सामान ठेवलेले असते. अनेकदा बसचे कर्मचारी गँगवेत बसलेले असतात म्हणजे रस्त्यात जागोजागी सामान उतरवणे सोपे जावे. यामुळे या बसेसमध्ये भारक्षमतेहून अधिक पट वजन होते आणि त्यामुळे वाहनाचे संतुलन देखील बिघडते.

त्यामुळे अनेक बसेस रस्त्यावर एका बाजूला वजनाने झुकलेल्या दिसतात. त्यामुळे थोडीशी ठिणगीही अपघाताला निमंत्रण ठरु शकते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आपात्कालिन संकटाच्या काळात प्रवाशांना काही मिनिटात बसमधून बाहेर निघणे अशक्य होते. याचमुळे जैसलमेर असो की आंध्रप्रदेशातील घटनेत प्रवासी जीवंत जळाले.

 नियमबाह्य बस वाहतूक

अनेक बसेसना विना परमिट आणि विना फिटनेस प्रमाणपत्रांच्या शिवाय चालवले जाते. सणासुदीच्या दिवसात यांची संख्या मोठी असते. परिवहन विभाग आणि ट्रॅफीक पोलिसांच्या संगनमताने या राज्यांच्या सीमा या बसेस ओलांडतात. मुंबईत सायन सर्कल, बोरीवली,वाशी स्थानक, चेंबूर मैत्री पार्क, लोअर परळ येथून खाजगी बसेसची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. या बसेस जागोजागी थांबवून प्रवासी घेत जात असतात.

अनेक मोडीत निघालेल्या बसेसच्या चेसिसवर मोडीफाय करुन डबल डेकर बसेस तयार केल्या जात असतात. गुरुग्राम, रेवाडी आणि राजस्थान सीमेवर नूंह जिल्ह्यातून रोज २० हून अधिक भंगार बसेस उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी रवाना केल्या जातात. त्यातील अनेक बसेस रेकॉर्डमध्ये स्क्रॅप घोषीत केलेल्या असतात. त्यांना मॉडीफाय करुन डबल डेकर म्हणून रस्त्यावर उतरवले जाते.

या बसेसचे मुख्य ठिकाण राजस्थान बॉर्डरवरील नूंह जिल्ह्यातील खोरी बॅरियर आहे. सकाळ आणि सायंकाळी वेळी येथून बलिया, अयोध्या, गोरखपूर, छपरा, दरभंगा आणि बेतियासाठी रवाना होतात.

या बसेसची क्षमता सुमारे ४० प्रवाशांची असते. परंतू यात ५० हून अधिक लोकांना बसवले जाते. बसेसची डिग्गी टॅक्स चोरीच्या सामानाची वाहतूक करण्यासाठी वापरली जाते. या बसेसमध्ये कोणतीही सुरक्षा उपकरणे देखील नसतात.

मजबूरीचा फायदा उठवतात ऑपरेटर

रेवाडी, धारूहेडा, बावल, भिवाडी, नीमराणा खुशखेडा सारख्या औद्योगिक क्षेत्रात लाखोंच्या संख्येत उत्तर प्रदेश आणि बिहारचे मजूर काम करत आहेत. परंतू त्यांच्या गावापर्यंत थेट बस सेवा नाही. याचा फायदा उठवून खाजगी बस ऑपरेटर जुन्या मोडकळीस आलेल्या बसेस वाहतूकीत आणून पैशांची कमाई करतात.

वारंवार अपघात, परंतू कारवाई नाही

गेल्या काही दिवसात देशभरात तीन मोठे अपघात झाले आहेत. जैसलमेर आणि आंध्रप्रदेश बस आगीच्या घटनेत ४६ लोक जळून ठार झाले आहेत. बसच्या अपघातानंतर थोडे दिवस कारवाई केली जाते. त्यानंतर आरटीओची मोहिम पुन्हा थंड होते.
या खाजगी बसेसमध्ये माल वाहतूक करण्याची परवानगी नाही. तरीही विविध विभागांच्या मदतीने संपूर्ण देशात खाजगी ट्रॅव्हल्स बसेसमधून नियमबाह्यपणे सामानाची वाहतूक केली जाते. यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
टूरिस्ट परमिटच्या बसेसमधून टप्पा वाहतूक करुन प्रवासी भरणे आणि मालवाहतूक करणे बेकायदेशीर आहे. यासाठी कठोर कायदा आणि भ्रष्टाचार मुक्त व्यवस्थेची आवश्यकता आहे .

अखेर जबाबदारी कोणाची ?

कायद्यानुसार टुरिस्ट बसेस केवळ टुर पॅकेज किंवा ग्रुप प्रवासासाठी असतात. त्यातून सर्वसाधारण प्रवासी वाहतूक करणे चुकीचे आहे. त्यामुळे विना परमिट, विना फिटनेस आणि सुरक्षेशिवाय या बसेस रस्त्यांवर कशा काय चालवण्यात येत आहे ? असा सवाल निर्माण झाला आहे.याचे उत्तर परिवहन विभाग, आरटीओ, वाहतूक पोलिस कोणाकडेच नाही. कारण प्रत्येकाचे हितसंबंध एकमेकांशी जुळलेले आहेत.

 “शयनयान वाहन प्रवासी सुरक्षा मार्गदर्शन”

राज्य परिवहन महामंडळाने म्हणजे एसटी महामंडळाने या अपघातानंतर काही दिवसांपूर्वी “शयनयान वाहन प्रवासी सुरक्षा मार्गदर्शन” मोहिम सुरू केल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

या मोहिमे अंतर्गत स्लीपर बसमधील प्रवाशांनी स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी काही आवश्यक उपाय आणि नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे आवाहन केले आहे.

आपत्कालीन प्रसंगी बाहेर पडण्याचे प्रमुख मार्ग

बसेसला आग लागल्यास किंवा अपघात झाल्यास बसमधून सुरक्षित बाहेर पडण्याचे काही निश्चित मार्ग असतात, मात्र त्यांची माहिती नसल्यामुळे अनेकदा जीवितहानी वाढते.

बसेसचा मुख्य दरवाजा नेहमी खुला आणि अडथळामुक्त ठेवावा.

आपत्कालीन दरवाजा (Emergency Exit) — बसमध्ये असलेला हा मार्ग कधीही अडथळ्यांनी रोखू नये.

छतावरील एस्केप हॅच (Escape Hatch) — बसच्या छतावर साधारणपणे दोन ते तीन हॅच असतात; आगीच्या प्रसंगी त्यांचा वापर करावा.

सुरक्षा हातोडी (Emergency Hammer) — प्रत्येक वातानुकूलित बसच्या खिडकीजवळ असते; काच फोडून बाहेर पडण्यासाठी याचा उपयोग करावा.

प्रवाशांनी घ्यावयाची काळजी आणि तयारी

परिवहन विभागाच्या सूचनांनुसार प्रवाशांनी खालील बाबींचे पालन करावे:

बसमध्ये बसल्यानंतर सर्व बाहेर पडण्याचे मार्ग आधीच पाहून ठेवा.

आपत्कालीन दरवाज्यासमोर सामान ठेवू नका

हातोडी आणि तिचा वापर कसा करायचा हे जाणून घ्या

संकटाच्या वेळी घाबरू नका,गोंधळून जाऊ नका शांतपणे कृती करा.

कपड्यांना आग लागल्यास पाणी किंवा चादर टाकून आग विझवावी.

धूर भरल्यास जमिनीला लागून सरकून बाहेर पडावे.

कोणत्याही परिस्थितीत सामान वाचवण्याचे प्रयत्न करू नये.

बस सुरू होण्यापूर्वी चालक आणि वाहक यांनी प्रवाशांना आपत्कालीन मार्गांची माहिती द्यावी.

अतिरिक्त सुरक्षा सूचना

परिवहन विभागाने काही पूरक खबरदारींचीही सूचना केली आहे —

बसमध्ये चढल्यानंतर जर धूर, जळक्या वायरी, किंवा चार्जिंग पॉईंट गरम होणे दिसले, तर त्वरित चालकाला कळवा.

ज्वलनशील पदार्थ, फटाके, पेट्रोलियम पदार्थ घेऊन प्रवास करू नका.

विशेषतः रात्रीच्या प्रवासात सतर्कता बाळगा.

आपत्कालीन मदतीसाठी ‘१००’, ‘१०८’ किंवा स्थानिक अग्निशमन दलाशी संपर्क साधा.

“आगीचा त्रिकोण” काय असतो ?

तज्ञांच्या मते, आग टिकून राहण्यासाठी तीन घटक — ऑक्सिजन, उष्णता आणि ज्वलनशील पदार्थ आवश्यक असतात. यांपैकी एक घटक तोडल्यास आग नियंत्रणात येऊ शकते. त्यामुळे प्रवाशांनी शक्य असल्यास आग अलगद झाकून ऑक्सिजनचा पुरवठा थांबवण्याचा प्रयत्न करावा.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!