
प्रभात वृत्तसेवा
नेवासे – आगामी नगरपंचायत निवडणूक क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून लढविण्यात येणार असल्याची घोषणा माजीमंत्री शंकरराव गडाख यांनी केली. “आपली ही लढाई ही कोणत्याही व्यक्ती वा पक्षाविरोधात नसून नेवासे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आहे.सर्वांना सोबत घेऊन काम काम करू, अशी ग्वाही दिली.नेवासे नगरपंचायत नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया सोमवारी (दि.१०) सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत नेवासा शहरातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी मुळा साखर कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर, अॅड.आण्णासाहेब अंबाडे, आण्णासाहेब पटारे यांनी मनोगत व्यक्त केले. माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली नेवासे नगरपंचायतच्या नगरसेवकपदाच्या सर्व जागा व नगराध्यक्षपदाची जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार उपस्थित मान्यवरांनी याप्रसंगी केला.गडाख यांनी सांगितले की,सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने व शिस्तबद्धपणे काम करून नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदावर जास्तीत – जास्त उमेदवार निवडून आणावेत.
सोमवार (दि.१०) पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असल्यामुळे आजच्या बैठकीत कार्यकर्ते व संभाव्य उमेदवारांना आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आल्या. क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीत नव्या जोमाने आणि विकासाच्या हेतूने उतरल्याचे आमदार गडाख यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी नेवासा शहरातील प्रमुख कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.सन 2017 मध्ये झालेल्या नेवासा नगरपंचायत निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते.
The post Nevasa News : क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढविणार – माजी मंत्री शंकरराव गडाख appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











