Maharashatra News Live : नंदुरबार स्कूल बस अपघात, चालक आणि आश्रम शाळा प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल होणार

Maharashatra News Live :  नंदुरबार स्कूल बस अपघात, चालक आणि आश्रम शाळा प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल होणार
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

नंदुरबारच्या देवगोई घाटात झालेल्या अपघातामुळे दोन विद्यार्थ्यांच्या जीव गेला आहेत तर दोघ विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आश्रम शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाला आहे एका मिनी बस मध्ये 56 विद्यार्थी एक शिक्षक एक शिपाई आणि एक चालक असे मिळून 59 लोक बस मध्ये होते. आश्रम शाळा प्रशासनाने हलगर्जी केल्यामुळे अक्कलकुवा पोलीस ठाण्यात चालक आणि आश्रम शाळा प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल होणार आहे. अपघात झाल्यानंतर रात्री उशिरा चालक स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. नाशिक शहरात आज विरोधी पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. मनसे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), कम्युनिस्ट आणि वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार. नाशिकमधील राजकीय वातावरण तापणार आहे. धाराशिव जिल्ह्यात आठ नगरपरिषदांच्या नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आज अकरा वाजता सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील एकूण आठ नगरपालिकेमध्ये 189 नगरसेवकांच्या जागेसाठी उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!