
प्रभात वृत्तसेवा
भोर – भोरच्या माजी नगराध्यक्ष निर्मला आवारे व माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांनी इतर कार्यकर्त्यांसह भाजपा पक्षाला रामराम करीत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. यामुळे आगामी होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीची राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.पुणे येथे पक्षप्रवेशाचा सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार व भोर विधानसभेचे आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी माजी नगराध्यक्ष निर्मला आवारे व माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र आवारे, ऋषभ आवारे यांच्यासह माजी नगरसेवक गजानन शेटे, अमित जाधव, बाळा शेटे, चेतन उल्हाळकर, विजया उल्हाळकर, स्नेहा उल्हाळकर, ऋषिकेश शेटे, अनिकेत माने, स्वप्निल तारू, प्रथमेश गाढवे, विशाल मोहिते, गणेश घोणे, संतोष बारटक्के, नितीन झणझणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
भोर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदावर कार्यरत असताना निर्मला आवारे यांनी शहरात अनेक विकासकामे राबविली आहेत. नगरपालिकेतील विविध विषयांवर त्यांनी पुढाकार घेत नागरिकांचा विश्वास संपादन केला होता. मात्र, अलीकडच्या काळात पक्षात अंतर्गत मतभेद झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजते.
या पक्षप्रवेश सोहळ्याच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ” भोर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणाऱ्यांना योग्य मान-सन्मान आणि स्थान मिळेल,” असे आश्वासन त्यांनी दिले. यादरम्यान आमदार शंकर मांडेकर यांनीही आवारे दांपत्य आणि सहकाऱ्यांचे स्वागत करत, त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी होईल, असे म्हटले.
भाजपाला खिंडार..
भोरमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.भोर शहरात भाजपला खिंडार पडले असून राष्ट्रवादी काँग्रेसला या नव्या बळामुळे स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
The post Bhor Politics : भोरमध्ये भाजपला मोठे खिंडार; माजी नगराध्यक्ष निर्मला आवारे पतीसह अजित पवार गटात दाखल appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











