“पार्थ पवारांच्या गंडलेल्या घोटाळ्यावर मुळशी पॅटर्न २ चित्रपट बनावा”; लक्ष्मण हाकेंची पोस्ट म्हणाले “बापाने ७० हजार कोटी…”

Laxman Hake post : महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थोरले पुत्र पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमिन प्रकरणाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नाही. यामुळे विविध प्रकराच्या चर्चा झडू लागल्या आहेत.
या प्रकरणात शीतल तेजवानी, दिग्विजयसिंह पाटील, रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शीतल तेजवानी यांनी परदेशात पलायन केल्याची माहिती देखील समोर आली आहे. हा व्यवहार रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. पण त्यासाठी तेजवानी यांची उपस्थिती गरजेची असणारा आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्क जवळ असलेल्या ४० एकर महार वतनाची जमिन ज्या जमिनीचा व्यवहार करता येत नाही. याची खरेदी करण्यात आली. १८०४ कोटी बाजारभाव असलेली जमिन केवळ ३०० कोटी रुपयांचा खरेदी करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या व्यवहारासाठी केवळ ५०० रुपये स्टॅप ड्युटी भरण्यात आली आहे.
या प्रकरणाची चौकशी सुरू असून पार्थ पवार यांच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा आहे. अशातच ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली असून, या पोस्टमधून त्यांनी अनेक मोठे दावे करत सवाल उपस्थित केले आहेत.
बापाने ७० हजार कोटी पचवले साधी ढेकर दिली नाही. पार्थ पवार १५०० कोटींच्या घोटाळ्यात सापडले. अशी बोचरी टीका लक्ष्मण हाकेंनी पोस्टमधून केली आहे. ‘नया है वह’ म्हणत त्यांना सोडूनच दिले जाईल. नवा जमिन घोटाळा करताना पार्थ पवारांनी जुन्या चुका करु नयेत, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.
 
नेमकं काय म्हणाले हाके?
 
पार्थ पवारांच्या गंडलेल्या घोटाळ्यावर मुळशी पॅटर्न २ चित्रपट बनावा. ( पवार पॅटर्न बारामती ) १८०० कोटींची महार वतनाची जागा ३०० कोटीत लाटण्याचं काम पार्थ पवारने केलं. आई वडीलांकडून मुलं संस्कार शिकत असतात. पार्थ पवार दोन तीन वर्षांचे होते. तेव्हा अजित पवार व सुनेत्रा पवारांनी बारामतीच्या सोनगावमधील ३ एकर महार वतन लाटले आणि पार्थ पवारच्या नावे केले अशी पत्रकार परिषद बहुजन नेते काळुराम चौधरी यांनी केली म्हणजे बारा खडी शिकायच्या वयात सातबारा फिरवण्याची कला पार्थ पवारांना शिकवण्यात आली, असा घणाघात हाकेंनी केला आहे.
पुढे ते म्हणाले, बापाने ७० हजार कोटी पचवले साधी ढेकर दिली नाही. पार्थ पवार १५०० कोटींच्या घोटाळ्यात सापडले. ‘नया है वह’ म्हणत त्यांना सोडूनच दिले जाईल. नवा जमिन घोटाळा करताना पार्थ पवारांनी जुन्या चुका करु नयेत.
उदा.
-एक लाख रुपये भागभांडवल असणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून ३०० कोटींचा व्यवहार करु नये.
-शेकडो कोटींचा व्यवहार फक्त ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करु नये.
-सरकारी खात्याची जमिन खासगी कंपनीकडे घेताना अधिकची काळजी बाळगावी.
-भविष्य काळात मरिनड्राईव्ह, ताज हॉटेल, मलबार हिल्स, विधानभवन अशा जागांवर हात मारावा. किरकोळ महार वतनांच्या. जमिनींकडे दुर्क्ष करावे.
प्रत्येकाकडे कला असते. पवारांच्या हातता जमिनी गायब करण्याची जादूची कांडी आहे. त्याचं व्यवस्थित प्रशिक्षण पार्थ पवारांनी घ्यावं. भविष्यात १५, २० हजार कोटींच्या जमिन खरेदीचा घोटाळा करावा. राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्तेची शिखरं गाठली ती दलित, मुस्लीम,तओबीसी, उपेक्षित घटकांच्या नरडीवर टाच ठेवून. पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव हे आहे की सरंजामी पद्धतीचं राजकारण करणाऱ्यांच्या हाती महाराष्ट्राची सत्ता आहे. पार्थ पवारने महार वतनाची जमिन कंपनीच्या नावे केली तेव्हा जणांना उचलून आणलं? किती लोकांच्या अनात माती कालवली नेमकं या प्रकरणात काय काय घडलं असेल याचं सत्य महाराष्ट्रा पुढे येईल असे वाटत नाही, असे पोस्टमध्ये लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

The post “पार्थ पवारांच्या गंडलेल्या घोटाळ्यावर मुळशी पॅटर्न २ चित्रपट बनावा”; लक्ष्मण हाकेंची पोस्ट म्हणाले “बापाने ७० हजार कोटी…” appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!