“राष्ट्रवादीची अशी औलाद, जी सत्तेशिवाय राहू शकत नाही,” तानाजी सावंतांचा मित्रपक्षावरच हल्लाबोल

Tanaji Sawant |
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Tanaji Sawant |  माजी मंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीची औलद सत्तेशिवाय राहू शकत नाही, असे वक्तव्य सावंत यांनी केल्याने आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

धाराशिवमध्ये बोलताना माजी मंत्री आमदार तानाजी सावंत म्हणाले की, “राष्ट्रवादीची औलाद अशी आहे ती सत्तेशिवाय राहू शकत नाही. पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर कसा तडपडतो तसं राष्ट्रवादीला होतं. या दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, हे मी सांगितले होते. असं सांगणारा महाराष्ट्रातील मी एकमेव आमदार आहे. याचा प्रत्यय तुम्हाला गेल्या महिन्याभरात आला असेल,” असेही सावंत म्हणाले.

 युतीची तत्त्व मान्य नसतील तर… 

“तुम्हाला युतीची तत्त्वे जर माहित नसतील तर तुम्ही कशासाठी युती करत आहेत. हिंदुत्व त्यांनी स्वीकारलं का?, हिंदुत्व मान्य आहे का? मांडीला मांडी लावून बसतात युतीची तत्त्व मान्य नसतील तर तुम्ही कशासाठी आमच्यावर त्यांना लादता. तसेच गरज नसताना तुम्ही त्याला का घेतलं?”, राहुल मोटेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून सावंतांनी टीकेचे बाण सोडले. Tanaji Sawant |

आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात रणनीतीसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. मी एकला चलो रे चा नारा दिला नाही, मोठ्या पक्षाने आम्हाला विश्वासात न घेता एकला चलो रे चा नारा दिला, त्यामुळे आम्हीही कुठे गाफील नाहीत, सर्व जागा लढवण्याची आमची तयारी आहे. भाजप, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी , काँग्रेस सर्व एकत्र येत आहेत, त्यातच आजच आमचा विजय आहे, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले आहे. Tanaji Sawant |

दरम्यान, भूम, परंडा नगरपरिषदेत आमदार तानाजी सावंत यांना घेरण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र येणार आहे. भाजप, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी आमदार तानाजी सावंतांविरोधात एकत्र नगरपरिषद निवडणूक आखाड्यात उतरणार असल्याची चर्चा धाराशिवमध्ये सुरू झाली आहे. Tanaji Sawant |

हेही वाचा: 

आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार? उद्धव ठाकरेंनी मोदी-शाहांचे नाव घेत स्पष्टच सांगितले…

The post “राष्ट्रवादीची अशी औलाद, जी सत्तेशिवाय राहू शकत नाही,” तानाजी सावंतांचा मित्रपक्षावरच हल्लाबोल appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!