
प्रभात वृत्तसेवा
नेवासे – अहिल्यानगर जिल्ह्याचे भूषण आणि राज्यात नावाजलेले प्रसिद्ध किर्तनकार तथा समाज प्रभोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची कन्या कु. ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साखरपुडा साहिल चिलाप यांच्या बरोबर नुकताच मोठ्या राजेशाही थाटात हा सोहळा संगनेरात पार पडला. या झालेल्या दिमाखदार राजेशाही साखरपुडा सोहळ्यामुळे सध्या वारकरी संप्रादायासह नेटकरी मंडळी,आता प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांवर सोशल मीडियावर चांगलेच तुटून पडत आहेत.
इंदुरीकर महाराज म्हणजे “लोकांस सांगे तत्वज्ञान आणि आपण माञ कोरडे पाषाण” या उक्ती प्रमाणे इंदुरीकर महारांजावर सध्या टिकेचा भडीमार होतांना दिसून येत असून त्यांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्यात केलेल्या खर्चावर सोशल मीडियात चांगलेच चर्चेचे काहूर पेटलेले दिसत आहे.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आपल्या मुलीच्या साखरपुडा कार्यक्रमात केलेल्या खर्चाचे अर्थिक गणित सध्या नेटकरीमंडळी सोशल मीडियात मांडून इंदुरीकर महाराजांना चांगलेच धारेवर धरुन टिका करतांना दिसून येत आहेत.
साधे लग्न केले तरी पोरं होतात? असे इंदुरीकर महाराज आपल्या किर्तनात सांगून साधेपणाने लग्न करण्याचा सल्ला ते समाजात देत असतांना त्यांनी आपल्या मुलीच्या साखरपुडा कार्यक्रम मोठ्या राजेशाही थाटात केल्यामुळे त्यांच्यावर सध्या नेटकरी मंडळी टिका करतांना दिसून येत आहे.इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. साहिल चिलाप हे बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती समोर येत असून त्यांचा मुंबईमध्ये मोठा व्यावसाय आहे.
सोबतच त्यांच्या मुळगावी पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये त्यांची बागायती शेती देखील असल्याची माहिती चर्चेतून समोर येतांना दिसत आहे. दरम्यान आपल्या मुलीच्या या झालेल्या साखरपुडा कार्यक्रमाच्या खर्चावरून इंदुरीकर महाराज सध्या चांगलेच टीकेचे धनी होत असल्याचे दिसून येत असून नेटकरी मंडळी आणि वारकरी संप्रादयातील महाराज मंडळीही आता इंदुरीकर महाराज यांना चांगलेच ट्रोल करतांना दिसून येत आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलीच करमणूक होतांना दिसून येत आहे.
The post “लोका सांगे तत्वज्ञान, आपण कोरडे पाषाण”; मुलीच्या शाही साखरपुड्यावरून इंदुरीकर महाराज नेटकऱ्यांच्या निशाण्यावर appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











