
प्रभात वृत्तसेवा
वाई – आगामी वाई नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल झालेल्या जिल्हा महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर आज अधिकृतरीत्या घेण्यात आला.वाई येथे आज झालेल्या आघाडीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.
या बैठकीस काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलास पिसाळ, जिल्हा सचिव अतुल संकपाळ, शहराध्यक्ष प्रदीप जायगुडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) वाई विधानसभा अध्यक्ष व निरीक्षक डॉ. नितीन सावंत, निवडणूक समन्वयक डॉ. सतीश बाबर, शहराध्यक्ष संतोष शिंदे, माजी नगरसेवक कैलास जमदाडे, युवक अध्यक्ष संग्राम कदम, तालुका पश्चिम विभाग संघटक प्रवीण महांगडे, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे तालुका प्रमुख तेजस पिसाळ, उपजिल्हा प्रमुख संतोष आप्पा शिंदे, शहर प्रमुख किरण खामकर, माजी तालुका प्रमुख सुरेश चव्हाण, वाहतूक शाखा प्रमुख संतोष पोफळे उपस्थित होते.
वाई शहराच्या विकासासाठी एकत्र येणे, पारदर्शक प्रशासन, भ्रष्टाचारमुक्त व लोकाभिमुख नगरपरिषद निर्माण करणे या प्रमुख उद्दिष्टांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.या निवडणुकीसाठी ‘नगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी समन्वय समिती’ तयार केली असून त्यामध्ये काँग्रेसचे विलास पिसाळ, अतुल संकपाळ, प्रदीप जायगुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) डॉ. सतीश बाबर, संतोष शिंदे, कैलास जमदाडे तसेच शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तेजस पिसाळ, किरण खामकर, दत्तात्रय इथापे यांचा समावेश आहे.
इच्छुकांनी आपला उमेदवारी अर्ज त्या त्या पक्षाच्या समिती प्रतिनिधींकडे सादर करावेत, असे समितीतर्फे कळविण्यात आले आहे. उमेदवार निश्चिती व पुढील रणनीतीबाबतची पुढील महत्त्वपूर्ण बैठक उद्या दि. ९ रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. सतीश बाबर यांच्या निवासस्थानी (धोम कॉलनी रोड, वाई) होणार आहे. या बैठकीस महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, इच्छुक उमेदवार व प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे.
The post Wai municipal election : वाईच्या मैदानात महाविकास आघाडी एकत्रित लढणार ; जागावाटपाची रणनीती आज ठरणार appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











