
मुंबई : राज्यातील आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेसोबत आघाडी करायची की नाही याबाबत महाविकास आघाडीची उद्या, रविवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मनसेबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली.
शरद पवार म्हणाले की, मनसेला आगामी निवडणुकीत सोबत घ्यावे की नाही याचा निर्णय बैठकीत होईल. मी माझ्या पक्षाचा प्रमुख आहे. मी काँग्रेसचे कोणते निर्णय घेत नाही. परंतु उद्याच्या बैठकीत यावर निर्णय होऊ शकतो. मनसेबाबत मविआ एकत्र बसून निर्णय घेईल. आमच्या पक्षाचे निर्णय सर्वांना विचारात घेऊनच होतात. जर महाविकास आघाडीमध्ये एकमताने चांगला पर्याय समोर आला तर काँग्रेस पक्षाने मनसेबाबत अतिरेकी भूमिका घेऊ नये आणि त्याबद्दल विचार करावा, असेही ते म्हणाले.
मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत मनसेसोबत कोणत्याही प्रकारची आघाडी करू नये, असा पदाधिकाऱ्यांचा एकमताचा सूर होता. मनसेला सोबत घेतल्यास काँग्रेसच्या विचारसरणीला धक्का बसेल आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुखावतील असे काँग्रेस नेत्यांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर उद्याच्या मविआ बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आघाडी करायची की नाही, याबाबत महाराष्ट्र काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक बुधवारी होणार आहे. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उद्या ११ वाजता आपल्या निवासस्थानी शिवतिर्थवर बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना मुंबईतील शाखाप्रमुखांना देण्यात आल्या आहे.
The post अखेर मनसेचा मविआमध्ये समावेश? उद्या शिक्कामोर्तब होणार? appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











