पुणे बाजार समिती चौकशीत मोठा पेच! अधिकाऱ्यानेच दिला नकार, पणन संचालक म्हणाले मुदतवाढ घ्या,पण..

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौकशीसाठी नेमलेले विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी चौकशी करण्यास नकार दिल्याने पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे पणन संचालकांनी सुर्वे यांना चौकशीसाठी मुदतवाढ घ्या, पण तुम्हीच चौकशी करा, असे आदेशवजा साकडे घातले आहे.यापूर्वी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे चौकशी अधिकारी प्रकाश जगताप यांची चौकशीसाठी नियुक्ती केली होती. ती रद्द करून त्यांच्या जागी विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती.

पुणे बाजार समितीच्या विविध चौकशांचे आदेश पणन संचालकांनी दिले आहेत. तसेच पणनमंत्री जयकुमार रावळ यांनीही बाजार समितीतीतल कथिक गैरकारभाराची गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान, शासकीय यंत्रणा बाजार समितीच्या चौकशीसाठी वेळकाढूपणा करत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहनिबंधक दर्जाच्या त्रयस्त अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी, अशी पत्राद्वारे मागणी केली होती.

पवार यांच्या मागणीची दखल घेत नव्याने आदेश काढला होता. मात्र, आता सुर्वे यांनीच नकार दिल्याने कोणाला चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करणार, याबाबत पणन वर्तुळात चर्चा सुरू आहे. दरम्यान, पणन संचालक विकास रसाळ यांनी पुन्हा आदेश काढत मुदतवाढ घ्या, पण तुम्हीच चौकशी करा, असे आदेश सुर्वे यांना दिले आहेत. आता सुर्वे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

The post पुणे बाजार समिती चौकशीत मोठा पेच! अधिकाऱ्यानेच दिला नकार, पणन संचालक म्हणाले मुदतवाढ घ्या,पण.. appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!