Vadgaon Maval : निवडणुकीसाठी २४ मतदान केंद्रे सज्ज ; सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण, २ डिसेंबरला मतदान

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
वडगाव मावळ – वडगाव नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. एकूण १७ प्रभागांसाठी २४ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना सुरळीत मतदानाचा अनुभव मिळावा यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांनी दिली.

शुक्रवारी (दि. ७) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पुनर्वसन तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा तेलभाते यांनी सांगितले की, यंदा नगराध्यक्ष आणि १७ नगरसेवकपदांसाठी निवडणूक होणार आहे. अर्ज स्वीकृती प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू होईल, तर मतदान २ डिसेंबर रोजी होईल. मतमोजणी ३ डिसेंबरला नगरपंचायतीच्या सभागृहात पार पडेल.

मंगळवारपासून (दि. ४) आचारसंहिता लागू झाली असून, तिची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. फेसबुक, इंन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील लक्ष ठेवले जाणार आहे. आचारसंहिता भंग झाल्यास तत्काळ कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

उमेदवारी अर्ज प्रक्रिया..
उमेदवारांना अर्ज ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही माध्यमांतून सादर करता येतील. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांमध्ये जात प्रमाणपत्र (आरक्षित जागांसाठी), संपत्ती व कर्जाची माहिती, नॉन-क्रिमिनल प्रमाणपत्र, शौचालय अस्तित्वाचा दाखला, अपत्य संख्या नोंद (कुटुंब नियोजन प्रमाणपत्र), वयाचा पुरावा (जन्म दाखला), तसेच नगरपंचायतीची थकबाकी नसल्याचा दाखला जोडणे बंधनकारक आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी नगरपंचायतीच्या वतीने विशेष सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. येथे सर्व दाखल्यांची पूर्तता एकाच ठिकाणी करता येईल.

अनामत रक्कम व खर्च मर्यादा..
खुल्या वर्गासाठी रुपये एक हजार फक्त, तर आरक्षित वर्गासाठी रुपये ५०० फक्त अनामत रक्कम निश्चित करण्यात आली आहे निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी रुपये सहा लाख रुपये खर्च मर्यादा असून नगरसेवक पदासाठी रुपये दोन लाख २५ हजार रुपये खर्च मर्यादा आहे. प्रत्येक उमेदवाराने निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडणे अनिवार्य आहे.

The post Vadgaon Maval : निवडणुकीसाठी २४ मतदान केंद्रे सज्ज ; सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण, २ डिसेंबरला मतदान appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!