Bhigwan Accident : भिगवण-बारामती रोडवर ऊसाच्या ट्रॅक्टरने घेतला तरुणाचा जीव, नागरिक संतप्त

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
भिगवण – इंदापूर तालुक्यातील मदनवाडी हद्दीत ऊस वाहतुकीमुळे बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात किशोर बाळासो साळुंखे (वय 30, रा. मदनवाडी, विरवाडी नं. 2) या तरुणाचा मृत्यू झाला आहे.ही घटना भिगवण-बारामती रोडवर मदनवाडी हद्दीमध्ये घडली. याबाबत निलेश बाळासो साळुंखे (वय 33) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे भाऊ किशोर हे टीव्हीएस स्पोर्ट (एमएच 42 एव्ही 9325) या दुचाकीवरून जात असताना,

महिंद्रा कंपनीचा अर्जुन 605 (एमएच 18 सीई 7153) या ट्रॅक्टरच्या अज्ञात चालकांने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यामुळे किशोर साळुंखे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. यामुळे नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. संबंधित प्रशासनाने नियमबाह्य पद्धतीने ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकांवरती कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे

The post Bhigwan Accident : भिगवण-बारामती रोडवर ऊसाच्या ट्रॅक्टरने घेतला तरुणाचा जीव, नागरिक संतप्त appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!