
वॉशिंग्टन –भारत आणि अमेरिकेत दरम्यान व्यापार करारासंदर्भात चालू असलेले बोलणे अंतिम टप्प्यात आली आहे. एक संतुलित करार होण्याबाबत दोन्ही बाजू सकारात्मक प्रयत्न करीत आहेत. करार झाल्यानंतर अमेरिका भारतावरील आयात शुल्क कमी करेल. यामुळे पुन्हा भारतीय लोक अमेरिकेवर प्रेम करू लागतील असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे भारतातील नवे राजदूत सर्गोई गोर यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमा बोलताना ट्रम्प म्हणाले की, लवकरच भारताबरोबर करार होणार आहे. हा करार पूर्वीच्या करारापेक्षा वेगळा असेल. सध्या भारतीय लोक अमेरिकेवर प्रेम करत नाहीत आणि करार झाल्यानंतर ते पुन्हा प्रेम करू लागतील. भारत कराराच्या चर्चेवेळी अजिबात माघार न घेणारा देश आहे. त्यामुळे अमेरिकेला भारताबरोबर चर्चा करताना निरंतर सावध राहावे लागते.
भारताविरोधातील आयात शुल्क कमी करणार का असे विचारले असता ट्रम्प यांनी सांगितले की, भारत रशियाकडून तेल खरेदी करत होता. त्यामुळे शुल्क लावले होते. आता भारताने तेल खरेदी कमी केली आहे. अशा परिस्थितीत आयात शुल्क कमी करण्यावर विचार चालू आहे.
भारत हा सर्वात जुनी संस्कृती असलेला देश आहे. या 1.4 अब्ज लोकसंख्येच्या देशाबरोबर चांगले संबंध असावे असे अमेरिकेला वाटते. त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू आहेत.
तरीही काही खरे नाही –
मात्र ट्रम्प यांचा एकूण बदलणारा स्वभाव पाहता खरोखरच करार लवकर होईल की नाही याबद्दल विश्लेषकांना शंका आहेत. एखाद्या मुद्यावरून ट्रम्प आक्रमकपणे नकारात्मक भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर करार झाला तरी त्या कराराची अंमलबजावणी होईल की नाही याबद्दलही अनेकांना शंका आहे.
The post भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात; ट्रम्प म्हणाले – ‘भारतीय पुन्हा अमेरिकेवर प्रेम करू लागतील appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











