मुंबईत डॉक्टरांवर WWE स्टाइल हल्ला; रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईक आक्रमक; व्हिडीओ व्हायरल

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालय (कूपर हॉस्पिटल) मध्ये शुक्रवारी रात्री थरारक प्रकार घडला आहे. गंभीर अवस्थेतील रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या रागात एका नातेवाईकाने इमर्जन्सी वॉर्डमध्ये WWE रिंगचं मैदान तयार केलं. डॉक्टरांना लाथा-बुक्क्या, थप्पडा आणि खुर्च्याही मारल्या. हा संपूर्ण भयानक प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला असून, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

सायंकाळी सुमारे ७:३० वाजता ४५ वर्षीय रुग्णाला उपचारासाठी कूपरच्या इमर्जन्सी विभागात आणण्यात आलं. उपचार सुरू असतानाच रुग्णाचा मृत्यू झाला. ही बातमी कळताच रुग्णाचा एक नातेवाईक संतापला आणि ओरडत डॉक्टरांना शिवीगाळ करू लागला. पाहता पाहता त्याने एका रेसिडेंट डॉक्टरला कॉलर धरून थप्पड मारली, नंतर दुसऱ्या डॉक्टरला लाथ मारली आणि खुर्ची उचलून फेकली. वॉर्डमध्ये उपचार घेत असलेले इतर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक घाबरून गेले.

विशेष म्हणजे, वॉर्डमध्ये तैनात असलेला एक पोलीस कर्मचारीही हादरला. मारहाण करणाऱ्या व्यक्तीला पकडण्यासाठी पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांना मोठी झटापट करावी लागली. शेवटी त्याला बाहेर काढण्यात यश आलं. या मारहाणीत दोन रेसिडेंट डॉक्टर जखमी झाले. हा प्रकार इतका भयानक होता की काही काळ हॉस्पिटलमध्ये WWE च्या आखाड्यासारखे दृश्य निर्माण झाले होते.

दरम्यान, जुहू पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरोधात ३५३, ३३२, ५०४, ५०६ सह ३४ कलमांत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र डॉक्टरांच्या मागणीनुसार ३०७ (खुनाचा प्रयत्न) कलम अद्याप जोडले नाही. आरोपीला अटक झाली असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे मुंबईतील आरोग्य यंत्रणेच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. डॉक्टरांच्या संरक्षणासाठी तात्काळ कायदा आणि कठोर अंमलबजावणीची मागणी जोर धरू लागली आहे.

The post मुंबईत डॉक्टरांवर WWE स्टाइल हल्ला; रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईक आक्रमक; व्हिडीओ व्हायरल appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!