Who is Rashid Khan wife : कोण आहे राशिद खानची पत्नी? अखेर चेहरा आला समोर?

Who is Rashid Khan wife : कोण आहे राशिद खानची पत्नी? अखेर चेहरा आला समोर?
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Who is Rashid Khan wife: अफगाणिस्तानचा दिग्गज स्पिनर राशिद खानचा 2 ऑगस्ट 2025 रोजी निकाह झाला. राशिदने आपल्या पत्नीचा चेहरा दाखवला नव्हता. त्यामुळे फॅन्स सोशल मीडियावर राशिद खानच्या पत्नीबद्दल वेगवेगळे अंदाज लावायचे. आता राशिद खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. त्यात त्याने पत्नीचा उल्लेख केलाय. राशिद खानची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राशिदचे ‘खान चॅरिटी फाऊंडेशन’च्या उद्घाटन समारंभात सहभागी झाल्याचे फोटो व्हायरल झाले होते. यात अफगाणी पोषाखात असलेल्या राशिद खानच्या बाजूला एक महिला आहे. हा फोटो वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर लोकांमध्ये त्या फोटोबद्दल कुतूहल निर्माण झालं. आता राशिदने सोशल मीडियावर पोस्ट कुरन ती महिला कोण आहे? त्या बद्दल खुलासा केलाय. राशिदने कबूल केलं की, शेजारी दिसणारी महिला माझी पत्नी आहे. राशिदने फोटोचा चुकीचा अर्थ काढल्याबद्दल खेद व्यक्त केला. पत्नीला चॅरिटी उद्घाटन समारंभात तो घेऊन आलेला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashid Khan (@rashid.khan19)

Rashid Khan with Wife

आम्हाला काही लपवायची आवश्यकता नाहीय

“2 ऑगस्ट 2025 रोजी मी माझ्या जीवनातील एक नवीन आणि सार्थक अध्याय सुरु केला. माझा निकाह झाला. मी एका अशा महिलेशी लग्न केलं, जी शांतता आणि प्रेमाला मानते. ज्याची मला नेहमी अपेक्षा होती. मी अलीकडेच पत्नीला एका चॅरिटी कार्यक्रमात घेऊन गेलो होतो. इतक्या छोट्याशा गोष्टीवरुन अंदाज लावणं दुर्भाग्यपूर्ण आहे. ती माझी पत्नी आहे, हे सत्य आहे. आम्ही एकत्र आहोत, आम्हाला काही लपवायची आवश्यकता नाहीय. ज्यांनी दया, समर्थनक आणि समजूतदारपणा दाखवला त्या सर्वांचे आभार” असं राशिदने आपल्या लेटेस्ट पोस्टमध्ये लिहिलय.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!