बिहार विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएने बहुमताचा आकडा गाठला असला तरी, महाआघाडीने जोरदार टक्कर दिली आहे. एकूण 243 जागांपैकी एनडीए 121 जागांवर, तर महाआघाडी 104 जागांवर आघाडीवर आहे. नंतर एनडीएने 122 आणि 123 जागांपर्यंत मजल मारत सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला जादुई आकडा पार केला.
या राजकीय अनिश्चिततेचा परिणाम शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे. सेन्सेक्समध्ये 300 अंशांची घसरण झाली, तर निफ्टी 130 अंशांनी कोसळला. एक्झिट पोलचे अंदाज चुकवत, निकालांमध्ये एकतर्फी कल दिसत नाहीये. 15-20 जागांच्या फरकाने फासा पलटण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळात आणि गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक वाढली आहे. निवडणूक निकालांची धाकधूक वाढल्याने शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवली गेली. सेन्सेक्समध्ये 300 अंशांची घसरण झाली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 130 अंशांनी कोसळला. निवडणुकीच्या काळात शेअर बाजारात अशा प्रकारचे चढ-उतार अपेक्षित असले, तरी बिहारसारख्या ऐतिहासिक निवडणुकीतील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











