मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने संतोष देशमुख यांच्यानंतर काळकुटे यांचाच नंबर असल्याची धमकी दिली आहे. या संदर्भात, जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आरोपी दादा गरड यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात धनंजय देशमुख यांना 20 कोटींची ऑफर दिल्याचा दावा आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असून एका अज्ञात व्यक्तीने काळकुटे यांना संतोष देशमुख यांच्यानंतर तुमचाच नंबर आहे, अशी धमकी दिली. जर हिंमत असेल तर परळी येथील जगमित्र कार्यालयात येण्यासही त्यांना आव्हान देण्यात आले आहे. जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आरोपी दादा गरड यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये धनंजय देशमुख यांना 20 ते 30 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, टीव्ही9 मराठी या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही. या धमकीच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











