वाईत बहुरंगी लढतींची चिन्हं! उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड, अपक्षांमुळे वाढली चुरस

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
वाई : वाई नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज नामनिर्देशन दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी विविध प्रभागांमधून उमेदवारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निवडणूक प्रक्रिया सुरू होताच शहरातील राजकीय वातावरण रंगतदार झाले असून अनेक प्रभागांत बहुमूल्य सामने रंगणार याची चिन्हे दिसू लागली आहेत.निवडणूक अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत खालीलप्रमाणे उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत.

प्रभाग क्र. 2 अ मधून दत्तात्रय ज्ञानेश्वर सूर्यवंशी – भारतीय जनता पार्टी, प्रभाग क्र. 4 ब मधून जनार्दन कृष्णा भगत – शिवसेना, प्रभाग क्र. 5 अ मधून (आज कोणतेही अर्ज प्राप्त झाले नाहीत), प्रभाग क्र. 6 अ मधून विमल प्रताप लोखंडे – शिवसेना, प्रभाग क्र. 6 ब मधून महेश रामचंद्र गायकवाड – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, प्रभाग क्र. 7 अ मधून कुलदीप दिलीप शिंदे – भारतीय जनता पार्टी, कुलदीप दिलीप शिंदे – अपक्ष, दिलीप भीमराव शिंदे – अपक्ष,

प्रभाग क्र. 7 ब मधून स्वप्नाली जयदीप शिंदे – अपक्ष, प्रभाग क्र. 8 अ मधून सुरेश शशिकांत देशमाने – अपक्ष, प्रभाग क्र. 8 ब मधून पूनम विकास जाधव – अपक्ष, प्रभाग क्र. 9 ब मधून शंकर दत्ता खरात – अपक्ष यांनी अर्ज दाखल केले आहेत.

राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, काँग्रेस यांसारख्या प्रमुख पक्षांनी काही प्रभागांत डावलल्यामुळे अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी स्वतंत्रपणे जोरदार तयारी सुरू केली आहे. सोमवार हा एकच दिवस अर्ज भरण्यासाठी उरला असल्याने नामांकन अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

The post वाईत बहुरंगी लढतींची चिन्हं! उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड, अपक्षांमुळे वाढली चुरस appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!