Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टच्या प्रमुखपदी उद्धव ठाकरेंची नियुक्ती

Uddhav Thackeray
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक ट्रस्टची पुनर्रचना केली आहे. ज्यामध्ये ठाकरेसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील दादर परिसरात शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यावरील जागेवर शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधले जात आहे.स्मारकाच्या बांधकामाची देखरेख करणाऱ्या ट्रस्टमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासह इतर चार सदस्यांची नियुक्ती करण्याची अधिसूचना सरकारने शनिवारी जारी केली.

सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या ठरावानुसार माजी मंत्री सुभाष देसाई यांची ट्रस्टचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर उद्धव ठाकरे यांचे पुत्र, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या ट्रस्टमध्ये आमदार पराग अल्वाणी आणि माजी आमदार शिशिर शिंदे यांचाही समावेश आहे.

या ट्रस्टमध्ये पाच पदसिद्ध सदस्य देखील असतील. महाराष्ट्राचे मुख्य सचिव, प्रधान सचिव (शहरी विकास-II), प्रधान सचिव (कायदा आणि न्यायव्यवस्था), बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि सर्वसाधारण सभेतून निवडून येणाऱ्या सदस्यांसाठी राखीव असलेल्या दोन जागा आहेत. अध्यक्ष आणि सदस्य सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल, तर अलवाणी आणि शिंदे हे तीन वर्षांसाठी काम करतील.

The post Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टच्या प्रमुखपदी उद्धव ठाकरेंची नियुक्ती appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!