
मनिला – अतिशक्तिशाली फंग वोंग चक्रिवादळामुळे फिलिपीन्सला पुन्हा धोका निर्माण झाला आहे. देशाच्या इशान्येकडील किनाऱ्याजवळ हे वेदळ घोंघावत असून आज (रविवारी) हे वादळ किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या वादळामुळे हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले असून धोका असलेली शेकडो गावे रिकामी करावी लागली आहेत.
फंग वोंग हे चक्रिवादळ देशाच्या दोनतृतीयांश भूभागाला व्यापून टाकू शकेल, इतके मोठे असणार आहे. त्याचा परिघ अंदाजे १,६०० किलोमीटरचा असणार आहे. प्रशांत महासागरातून येणाऱ्या या वादळामुळे मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहतील, असा अंदाज आहे. कलमायगी वादळाच्या तडाख्यातून फिलिपीन्स अजून पुर्णपणे सावरले नाही.
या वादळामुळे किमान २०४ जण ठार झाले असून शेजारील व्हिएतनाममध्येही किमान ५ ठार झाले आहेत. कलमायगी वादळाने केलेल्या नुकसानीमुळे आणि फंग वोंग वादळाने होणाऱ्या संभाव्य हानीची शक्यता लक्षात घेऊन फिलिपीन्सचे अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनिअर यांनी राष्ट्रीय आणिबाणी घोषित केली आहे.
फंग वोंग वादळाचा वेग ताशी १८५ किमी आणि वाऱ्याचा वेग ताशी २३० किमी इतका नोंदवला गेला आहे. हे वादळ सध्या इशान्येकडील कॅटान्डुअन्स प्रांतातील विराक पासून १८५ किलोमीटर अंतरावर आहे. अरोरा किंवा इसाबेल प्रांताला आज संध्याकाळी उशीरा किंवा उद्या सकाळी हे वादळ थडकू शकते. वादळामुळे पाऊस, पूर, दरडी कोसळण्याची शक्यता आहे, असा इशारा संरक्षण सचिवांनी दिला आहे.
The post Typhoon Fung-wong : फंग वोंग चक्रिवादळामुळे फिलिपीन्सला पुन्हा धोका; शेकडो गावे केली रिकामी appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











