Thailand and Cambodia : थायलंड-कंबोडियामध्ये पुन्हा तणाव वाढला; सीमेवरील गोळीबारात एक ठार

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Thailand and Cambodia – थायलंड आणि कंबोडियामध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धबंदी करार झाला असला, तरी तणाव संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. दोन्ही देशांदरम्यानच्या वादग्रस्त सीमेवर गोळीबार झाल्याची घटना घडली असून यामुळे कंबोडियामध्ये एकजण ठार झाला आहे. युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप दोन्ही देशांनी एकमेकांवर केला आहे.

सोमवारी कंबोडियाच्या भुसुरुंगाच्या स्फोटामुळे थायलंडचा एक सैनिक जखमी झाला होता. त्याबद्दल कंबोडियाने माफी मागावी अशी मागणी बुधवारी थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत गेल्या महिन्यात दोन्ही देशांनी स्वाक्षरी केलेला वाढीव युद्धविराम करार स्थगित करत असल्याचे मंगळवारी, थायलंडने सांगितले.

कंबोडियाने नवीन भूसुरुंग पसरवल्याचा आरोप नाकारला आहे आणि थायलंडला ऑक्टोबरच्या कराराचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान थायलंडच्या सैन्याने बुधवारी दुपारी वादग्रस्त सीमावर्ती गावाजवळ गोळीबार केला, असा आरोप कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले, असेही थायलंडच्या मंत्रालयाने म्हटले आहे.

कंबोडियन सैनिकांनी सुरुवातीला थायलंडमध्ये गोळीबार केला, असे थाई लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल विंथाई सुवारी म्हणाले. दोन्ही देशांदरम्यानची ही वादग्रस्त सीमावर्ती वसाहत सा कायो प्रांतातील बान नोंग या कायो गावाचा भाग आहे, असा थायलंडचा दावा आहे. परंतु हा बान्टेय मीन्चे प्रांतातील प्रेय चान गावाचा भाग आहे, असा कंबोडियाचा दावा आहे.

The post Thailand and Cambodia : थायलंड-कंबोडियामध्ये पुन्हा तणाव वाढला; सीमेवरील गोळीबारात एक ठार appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!