तब्बल 15000 सैनिक तयार, कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका, डोनाल्ड ट्रम्प धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत!

तब्बल 15000 सैनिक तयार, कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका, डोनाल्ड ट्रम्प धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत!
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

America Venezuela Clash : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कधी कोणता निर्णय घेतील हे सांगता येत नाही. मी अनेक देशांमधील युद्ध थांबवले आहे, असा दावा ट्रम्प छातीठोकपणे करतात. यात भारत-पाकिस्तान युद्धाचाही समावेश आहे. त्यांनी हमास आणि इस्रायल यांच्यातही शांतता करार घडवून आणला आहे. मी जगातील युद्ध थांबवतो, असे सांगणार हेच डोनाल्ड ट्रम्प आता मोठ्या युद्धाच्या तयारीत आहेत. त्यांच्या आदेशानुसार अमेरिकेचे तब्बल 15 हजार सैनिक तयार ठेवण्यात आले आहेत. अमेरिकन लष्करात आता अनेक घडामोडी वाढल्या असून कोणत्याही क्षणी अमेरिका व्हेनेझुएला या देशावर हल्ला करू शकतो, असे सांगितले जात आहे. याच कारणामुळे आता समस्त जगाचे टेन्शन वाढले आहे.

नेमकं काय घडतंय?

डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका आणि अमेरिकन सौनिकांची तयारी याबाबत सीएनएनने एक वृत्त दिले आहे. अमेरिकेच्या लष्कराने या मोहिमेला ऑपरेशन साउथर्न स्पियर असे नाव दिले आहे. या अभियानात अमेरिकेने आपले 15 हजार सैनिक कॅरेबियन क्षेत्रात तैनात केले आहेत. कोणत्याही क्षणी हे सैनिक व्हेनेझुएलावर हल्ला करू शकतात. हे सैनिक फक्त डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट पाहात आहेत. विशेष म्हणजे डोनाल्ड टम्प यांनीदेखील शुक्रवारी (14 नोव्हेंबर) व्हेनेझुएला या देशावर हल्ला करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सध्या तणावाची स्थिती आहे. व्हेनेझुएलातून येणारे बेकायदेशीर प्रवासी, तेथून होणारी ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी आम्ही तेथील सत्तापरिवर्तनाच्या जवळ पोहोचलो आहोत, असे ट्रम्प म्हणाले होते.

अमेरिकेने काय काय तयारी केली?

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेने यूएसएस जेरॉल्ड आर फोर्ड हे जगातील सर्वात मोठे विमानवाहून जहाज कॅरेबीयन समुद्रात तैनात केले आहे. त्यामुळेच व्हेनेझुएला आणि अमेरिका यांच्यात फारच तणाव निर्माण झाला आहे. सोबतच आता 15 हजार सैनिक, डझनभर युद्धनौका, क्रुझर, डिस्ट्रॉयर, अॅम्फिबियस असॉल्ट शिप, एक हल्ला करणारी पाणबुडीही अमेरिकेने तयार ठेवली आहे. त्यामुळेच आता भविष्यात काहीही होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

ट्रम्प यांचा आरोप काय, व्हेनेझुएलाची काय तयारी?

अमेरिकेचा हा पवित्रा लक्षात घेऊन दुसरीकडे व्हेनेझुएला या देशानेही तयारी केली आहे. त्यांनी सैनिक जमा करण्याची घोषणा केली असून शस्त्रं जमाक केली जात आहेत. व्हेनेझुएला येथून अमली पदार्थ बेकायदेशीर पद्धतीने अमेरिकेत पाठवले जातात. जहाजांच्या मदतीने ही तस्करी होते, असा ट्रम्प यांचा आरोप आहेत. हाच आरोप करून याआधी त्यांनी कॅरेबियन समुद्रातील काही जहाजे उद्ध्वस्त करून टाकली आहेत. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलामधील सरकार उलथवून लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केला जातोय. असे असताना आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!