
Sunil Gavaskar warns Indian Women Team : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचत पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचा बहुमान मिळवला. या ऐतिहासिक कामगिरीनंतर संपूर्ण देशात आनंदाचा जल्लोष असून, संघावर आणि खेळाडूंवर पुरस्कारांचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामुळे खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपूट सुनील गावस्कर यांनी या पार्श्वभूमीवर महिला संघाला एक महत्त्वाचा आणि अनुभवाधारित सल्ला दिला आहे.
बीसीसीआयने केली ५१ कोटींच्या बक्षिसाची घोषणा –
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघाच्या यशाचा गौरव करण्यासाठी बीसीसीआयने ५१ कोटी रुपयांच्या रोख पारितोषिकाची* घोषणा केली आहे, ज्यात आयसीसीकडून मिळालेल्या ४० कोटी रुपयांच्या पुरस्काराचाही समावेश आहे. याशिवाय, विविध राज्य सरकारांनी ऋचा घोष, स्मृती मानधना आणि हरलीन देओल यांसारख्या खेळाडूंना रोख सन्मान आणि पुरस्कार जाहीर केले आहेत.
गावस्करांनी दिला ‘नाराज न होण्याचा’ सल्ला
मिड-डेमधील त्यांच्या स्तंभलेखात गावस्करांनी महिला संघातील खेळाडूंना भविष्यासाठी एक मोलाचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, जर तुम्हाला वचनं दिलेली काही बक्षिसं मिळाली नाहीत, तर निराश होऊ नका आणि ‘फार अपेक्षा ठेवू नका.’ कारण भारतातील जाहिरातदार किंवा ब्रँड पटकन शर्यतीत सामील होतात आणि विजेत्यांच्या खांद्यावर मोफत प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. संघाचे अभिनंदन करणाऱ्या पूर्ण पानाच्या जाहिराती आणि होर्डिंग्जकडे पाहिल्यास हे स्पष्ट होते की ते फक्त त्यांच्या ब्रँडचा किंवा स्वतःचा प्रचार करत आहेत, पण भारतीय क्रिकेटसाठी एवढी मोठी कामगिरी करणाऱ्यांना काहीच देत नाहीत.”
हेही वाचा – T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक २०२६ साठी २० संघ निश्चित; ‘हा’ देश खेळणार पहिल्यांदाच वर्ल्ड कप!
१९८३ च्या अनुभवावरून दिला इशारा –
सुनील गावस्कर यांनी हा इशारा त्यांच्या वैयक्तिक अनुभवाच्या आधारावर दिला आहे. त्यांनी १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकल्याची आठवण करून दिली. ते म्हणाले, “१९८३ मधील वर्ल्डकप विजेत्या संघाकरता त्या वेळी बऱ्याच आश्वासनांचा पाऊस पडला होता आणि माध्यमांमध्येही प्रचंड गाजावाजा झाला होता. पण त्यापैकी जवळजवळ काहीच प्रत्यक्षात आलं नाही.”
माध्यमांना दोष न देता गावस्कर पुढे म्हणाले, “माध्यमांना त्यासाठी दोष देता येणार नाही, कारण ती लोकं फक्त झालेल्या मोठमोठ्या घोषणा प्रसिद्ध करत होती, त्यांना हेही कळलं नाही की त्यांचाही वापर हे असे लोक स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करत आहेत. म्हणूनच, मुलींनो, जर हे निर्लज्ज लोक तुमच्या विजयाचा वापर स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी करत असतील, तर त्याबद्दल फार काळजी करू नका.” दिग्गज गावस्करांचा हा सल्ला ऐतिहासिक यश मिळवलेल्या महिला खेळाडूंना जमिनीवर राहून भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मदत करणारा आहे.
The post Sunil Gavaskar : ‘विश्वविजेत्या मुलींनो, आश्वासने फोल ठरली तर रडू नका…!’ गावस्करांचा भारतीय महिला संघाला इशारा appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











