
सिडनी : लहान मुलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेसाठी ऑस्ट्रेलिया सरकारने एक महत्त्वाचा आणि कठोर निर्णय घेतला आहे. १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचा कायदा देशात लागू होणार आहे.
पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी या निर्णयाचे समर्थन करताना स्पष्ट केले की, मुलांचे मानसिक आरोग्य आणि विकास सुरक्षित ठेवण्यासाठी हा कायदा अत्यावश्यक आहे. “डिजिटल विश्व मुलांच्या मानसिक आरोग्याच्या आणि विकासाच्या किमतीवर चालू शकत नाही,” असे ते म्हणाले.
‘ऑनलाइन सुरक्षा दुरुस्ती विधेयक २०२४’ नुसार, डिसेंबर २०२५ पासून १६ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या कोणत्याही मुलाला फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक, एक्स (ट्विटर), यूट्यूब, स्नॅपचॅट, रेडिट आणि किक यांसारख्या मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाऊंट उघडता येणार नाही किंवा जुने अकाऊंट सुरू ठेवता येणार नाही.
या कायद्यामुळे संबंधित सोशल मीडिया कंपन्यांना आपल्या वापरकर्त्यांच्या वयाची पडताळणी करण्यासाठी नवीन यंत्रणा सुरू करणे बंधनकारक असेल. स्क्रिन टाइमच्या व्यसनामुळे मुलांमध्ये वाढती चिंता आणि झोपेच्या समस्या दूर करण्यासाठी तसेच त्यांना ऑनलाइन धोक्यांपासून वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
The post Social Media: 16 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांना सोशल मिडीया वापरास बंदी; ऑस्ट्रेलिया सरकारने घेतला मोठा निर्णय – appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











