Shreya Ghoshal concert: कटकमध्ये श्रेया घोषालच्या कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी, महिला बेशुद्ध – पोलिसांचा लाठीचार्ज

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Shreya Ghoshal concert: ओडिशातील कटक येथे आयोजित करण्यात आलेल्या बालीयात्रा सांस्कृतिक महोत्सवात गुरुवारी रात्री गायिका श्रेया घोषाल यांच्या कॉन्सर्टदरम्यान गंभीर गोंधळ निर्माण झाला. मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या प्रेक्षकांच्या चेंगराचेंगरीसदृश परिस्थितीमध्ये एक महिला बेशुद्ध झाली, तर एक जण जखमी झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांना लाठीचार्ज करण्याची वेळ आली.

रंगमंचाजवळ पोहोचण्यासाठी लोकांची धावपळ, वाढला गोंधळ

कॉन्सर्ट सुरू होण्यापूर्वीपासूनच मैदानात मोठा जमाव जमा झाला होता. श्रेयाचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोक अक्षरशः रंगमंचाजवळ जाण्यासाठी धावत होते.
अनेक प्रेक्षक स्टेजच्या अगदी जवळ उभे राहण्यासाठी धडपडत होते. आधीच जवळ असलेले लोक जागा सोडायला तयार नव्हते. मागून आणखी लोक ढकलत आल्याने धक्काबुक्की वाढली. गर्दीची घुसमट वाढल्याने काही स्त्रिया चक्कर येऊन कोसळल्या. त्यापैकी एक महिला जागेवरच बेशुद्ध झाली. काही प्रेक्षक जखमी झाल्याचंही वृत्त आहे.

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल

गोंधळ काही मिनिटांत वाढल्याने आयोजक आणि सुरक्षा रक्षकांना परिस्थिती हाताळणे कठीण झाले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत, बेशुद्ध झालेल्या महिलेला तसेच जखमी प्रेक्षकांना जवळच्या रुग्णालयात प्रथमोपचारासाठी हलवलं.

लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात

गर्दी पांगवण्यासाठी आणि स्टेजसमोरचा ताण कमी करण्यासाठी पोलिसांनी मर्यादित लाठीचार्ज केला. त्यानंतर हळूहळू परिस्थिती नियंत्रणात आली. सुदैवाने या गोंधळात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

कॉन्सर्ट काही वेळ थांबवावा लागला

कार्यक्रमादरम्यान आलेल्या या गोंधळामुळे श्रेयाचा परफॉर्मन्स काही काळासाठी थांबवण्यात आला. सुरक्षा व्यवस्था मजबूत केल्यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला. पुढील कार्यक्रम शिस्तीत पार पडला.

बालीयात्रा महोत्सवाला दरवर्षी लाखोंची गर्दी

५ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबरदरम्यान होत असलेल्या बालीयात्रा महोत्सवातील श्रेया घोषालचा कॉन्सर्ट हा खास आकर्षण होता. त्यामुळे यंदाही प्रचंड गर्दी झाली; मात्र व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ही घटना समोर आली आहे.

 

The post Shreya Ghoshal concert: कटकमध्ये श्रेया घोषालच्या कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी, महिला बेशुद्ध – पोलिसांचा लाठीचार्ज appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!