
मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या रणांगणात उद्धव ठाकरे गटाने जोरदार तयारी केली आहे. पक्षाने ४० स्टार प्रचारकांची यादी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली असून, या यादीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह अभिनेते, राजे घराणे, मराठा चेहरे आणि आक्रमक नेते यांचा भरणा आहे.
हे ४० शिलेदार आगामी नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकांत महाराष्ट्र पिंजून काढणार असून, ठाकरे गटाला कमीतकमी १५० हुन अधिक जागा मिळवून देण्याचे लक्ष्य आहे. महत्त्वाचं म्हणजे, या यादीत खासदार संजय राऊत यांचेदेखील नाव आहे. पण ते सध्या तब्येतीच्या कारणास्तव उपचार घेत आहेत.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या संख्येची मर्यादा आता 20 वरून 40 केली आहे. तशी मागणी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी निवडणूक आयोगाकडे केली होती.
ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी
1. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray)
2. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)
3. सुभाष देसाई (Subhash Desai)
4. संजय राऊत (Sanjay Raut)
5. अनंत गीते (Anant Geete)
6. चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire)
7. अरविंद सावंत (Arvind Sawant)
8. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)
9. अनिल देसाई (Anil Desai)
10. विनायक राऊत (Vinayak Raut)
11. अनिल परब (Anil Parab)
12. राजन विचारे (Rajan Vichare)
13. सुनील प्रभू (Sunil Prabhu)
14. आदेश बांदेकर (Adesh Bandekar)
15. वरुण सरदेसाई (Varun Sardesai)
16. अंबादास दानवे (Ambadas Danve)
17. रवींद्र मिर्लेकर (Ravindra Mirlekar)
18. विशाखा राऊत (Vishakha Raut)
19. नितीन बनूगडे पाटील (Nitin Banugade Patil)
20. राजकुमार बाफना (Rajkumar Bafna)
21. प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi)
22. सचिन अहिर (Sachin Ahir)
23. मनोज जामसुतकर (Manoj Jamsutkar)
24. सुषमा अंधारे (Sushama Andhare)
25. संजय (बंडू) जाधव (Sanjay Jadhav)
26. किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar)
27. ज्योती ठाकरे (Jyoti Thakare)
28. शीतल शेठ–देवरूखकर (Sheetal Sheth Devrukhkar)
29. जान्हवी सावंत (Janhavi Sawant)
30. शरद कोळी (Sharad Koli)
31. ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar)
32. सुनील शिंदे (Sunil Shinde)
33. वैभव नाईक (Vaibhav Naik)
34. नितीन देशमुख (Nitin Deshmukh)
35. आनंद दुबे (Anand Dube)
36. किरण माने (Kiran Mane)
37. अशोक तिवारी (Ashok Tiwari)
38. प्रियांका जोशी (Priyanka Joshi)
39. सचिन साठे (Sachin Sathe)
40. लक्ष्मण वाडले (Laxman Wadle)
कल्याण-डोंबिवलीत धक्का, पण स्टार प्रचारकांनी कंबर कसली
दीपेश म्हात्रे भाजपमध्ये गेल्याने ठाकरे गटाला कल्याण-डोंबिवलीत धक्का बसला खरा, पण सुषमा अंधारे, अंबादास दानवे आणि किरण माने यांना विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे स्वतः १० डिसेंबरपूर्वी ठाणे-कल्याण दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा आहे.
The post Shivsena UBT : ठाकरेंच्या स्टार प्रचारकांची यादी तयार; ‘या’ दिग्गजांचा समावेश appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











